चिपळूणमधील 10 होर्डिंगचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

चिपळूणमधील 10 होर्डिंगचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

२ (टूडे १ साठी)

‘त्या’ होर्डिंगचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

चिपळूण पालिका आक्रमक; अनधिकृतांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर चिपळूण पालिकेने सर्व होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांची पायमल्ली करून शहरात अनेक होर्डिंग उभारण्यात आले आहेत. शहरात एकूण दहा होर्डिंग आहेत यातील किती जणांकडे परवानगी आहे याची माहिती गोळा करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.
चिपळूण शहरात बहादुरशेख नाका, मार्कंडी, मुंबई गोवा महामार्गावर, विजय मेडिकलच्या समोर, शहरातील पेट्रोल पंपावर, बुरुंमतळी येथे मध्यवर्ती बस स्थानकाच्या तसेच बाजारपेठेत होर्डिंग उभारण्यात आले आहे. या होर्डिंगच्या स्ट्रक्चरच्या सुरक्षिततेबाबत पालिका देखील शाशंक आहे. त्यामुळे पालिकेने होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाळ्यामध्ये असे होर्डिंग कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात जाहिरातींसाठी होर्डिंग उभे करताना पालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र या होर्डिंगचे शुल्क पालिकेने किती घ्यावे यावरून होर्डिंग मालक आणि पालिका यांच्यामध्ये वाद होतो. शासनाच्या नियमानुसार पालिका बोर्डिंगचे शुल्क आकारते, परंतु अनेक होर्डिंग मालक हे शुल्क टाळण्यासाठी अनधिकृत होर्डिंग उभारतात. घाटकोपरच्या घटनेनंतर चिपळूण पालिकेने शहरातील सर्वच लहान-मोठे होर्डिंग तपासण्यास सुरवात केली आहे.
-------------
कोट
पालिका हद्दीतील होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश शासनाकडून आले आहेत. त्याप्रमाणे आम्ही सर्व होर्डिंगधारकांना नोटीसा काढल्या आहेत. सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे होर्डिंग अनाधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
--अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com