ढोलवादन स्पर्धेत वाघजाई प्रथम

ढोलवादन स्पर्धेत वाघजाई प्रथम

९ (टूडे १ साठी, संक्षिप्त)

ढोलवादन स्पर्धेत
वाघजाई मंडळ प्रथम

पावस : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते-तेलेवाडीतील नवलाई मित्रमंडळातर्फे घेण्यात आलेल्या पारंपरिक ढोलवादन स्पर्धेत फणसवणेतील वाघजाई मित्रमंडळाने प्रथम, हेदली संघाने द्वितीय आणि मलदोबा संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. नवलाई मित्रमंडळ तेलेवाडीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा शुभारंभ संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. नागरगोजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सर्व विजेत्या संघाना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी परीक्षणाचे काम सुनील इंदुलकर, अजिंक्य रसाळ यांनी केले.
-------

करजुवे गावातील
रखडलेली कामे मार्गी
पावस ः संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील गेले पंधरा वर्षे रखडली कामे आमदार शेखर निकम यांनी मार्गी लावली. शाळा क्र. ३ ते शाळा क्र. २ या रस्त्याच्या कामासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर केला. या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण पूर्ण झाले. त्यामुळे करजुवे गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील कार्यालयात आमदार शेखर गोविंदराव निकम यांचे आभार मानले. या वेळी अजय चांदिवडे, पांडुरंग चांदिवडे, गोपिनाथ बाचिम, संतोष बाचिम, पांडुरंग वेलोडें, गोपाळ कांगणे, प्रकाश बाचिम, कृष्णा पाताडे, अनिल गोवळकर, सुभाष बाचिम आदी उपस्थित होते.
---------
माभळे काष्टेवाडीत
विविध स्पर्धा

संगमेश्वर ः तालुक्यातील माभळे-काष्टेवाडीतील अमर मित्रमंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात झाले. या वेळी गावकर गणपत काष्टे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर गीते, बाळकृष्ण काष्टे, अनंत भोसले आदी उपस्थित होते. यानिमित्ताने संगीत खुर्ची, फिरते घड्याळ, बॉल उडवणे आदींसह विविध स्पर्धा झाल्या. अमर मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
-----
रिक्षा चालक
पाटोळेंचा प्रामाणिकपणा
पावस ः लांजा तालुक्यातील तळवडे येथील रिक्षा व्यावसायिक योगेश उर्फ मुन्ना पाटोळे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत रेल्वे प्रवासी खामकर (रा. कुरुचुंब) यांचा सुमारे ५० हजाराचा ऐवज असलेली पर्स महिलेला परत केली. ही घटना मंगळवारी सकाळी आडवली रेल्वे स्थानक येथे घडली. सौ. खामकर या मे महिन्याच्या सुट्टीसाठी कुटुंबासह तुतारी एक्स्प्रेने गावी कुरुचुंब येथे येण्यासाठी सकाळी आडवली स्थानकात उतरल्या. आडवली स्थानकातून कुरुचुंब गावी जाण्यासाठी त्यांनी तळवडे येथील मुन्ना पाटोळे यांची रिक्षा भाड्याने केली. कुरुचुंब येथे घरी सोडून आल्यानंतर मुन्ना पाटोळे यांना रिक्षात एक पर्स विसरली असल्याचे लक्षात आले. पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम होती आणि खामकर यांची फोटो प्रत होती. आडवली रेल्वे स्थानक येथील सर्व रिक्षा चालक-मालक यांनी त्वरित सोशल मीडियावर पर्स विसरली असल्याचे निवेदन केले. त्यानंतर काही तासात ही पर्स कुरुचुंब येथील खामकर यांची असल्याचे सिद्ध झाले. खामकर यांनी ओळख पटवून महिलेला पर्स ऐवजासह परत केली.
-------

नवनिर्माणचा वाणिज्यचा
निकाल ८० टक्के

संगमेश्वर ः संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकाल ८० टक्के लागला असून हुदा काझी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विधी सुर्वेने द्वितीय आणि तृतीय क्रमांक साक्षी भोसले आणि चौथा क्रमांक प्राजक्ता फेपडे, प्रीती मोहिते आणि पाचवा क्रमांक प्रथमेश पालांडे याने पटकाविला. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. संजना चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com