कोकण रेल्वे मार्गावर
साप्ताहिक विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी

कोकण रेल्वेमार्गावर
साप्ताहिक विशेष गाडी
कणकवली ः उन्हाळी कालावधीत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याची वास्को द गामा-मुझफ्फरपूर-वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार वास्को द गामा-मुझफ्फरपूर (०७३०९) १५ मे ते १६ जून, तर मुझफ्फरपूर- वास्को द गामा (०७३१०) १८ मे ते १५ जून या कालावधीत धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीला सिंधुदुर्गात सावंतवाडी स्थानकावर थांबा आहे.
---------------------
करुळ महाविद्यालयात
श्रमसंस्कार शिबिर
कणकवली ः करुळ येथे राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले. एनएसएस सेवा योजनेंतर्गत राबविलेल्या उपक्रमांविषयी कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण भोकरे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमांना सरपंच समृद्धीनगर, प्राचार्य डॉ. डी. बी. कदम आदी उपस्थित होते.
---------------------
रस्ता दुरवस्थेमुळे
नागरिक संतप्त
कणकवली ः मराठा मंडळ येथील गडनदी बंधारा ते गोपुरी आश्रम येथील रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. हा रस्ता सुनसान असून रात्रीच्यावेळी याठिकाणी अपघात अथवा दुर्घटना घडल्यास गंभीर हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com