ठाकरे शिवसेनेतर्फे
शनिवारी शिबिरे

ठाकरे शिवसेनेतर्फे शनिवारी शिबिरे

ठाकरे शिवसेनेतर्फे
शनिवारी शिबिरे
देवगड ः येथील ठाकरेगट शिवसेना पक्षाचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या शनिवारी (ता.१८) असलेल्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्य शिबीरे घेण्यात येणार आहेत. तसेच नेत्र तपासणी करून चष्मे वाटपही केले जाणार आहेत. यानिमित्त शुक्रवारी (ता.१७) सकाळी १० ते २ या वेळेत तालुक्यातील नारिंग्रे येथील लवू दळवी यांच्या निवासस्थानी नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी श्रीकांत गावकर, मनोज भावे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन दीपक पवार यांनी केले आहे. शनिवारी (ता.१८) वाढदिवसादिवशी असलदे (ता. कणकवली) येथील दिवीजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर डेरवण (चिपळूण) येथील बी. के. एल. वालावलकर रूग्णालयाच्या सहकार्याने रविवारी (ता.१९) सकाळी १० ते २ या वेळेत तालुक्यातील मुणगे येथे मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी प्रमोद वळंजू, हरीश आडकर, तुषार धुरी, गुरू धुवाळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बाळा सावंत यांनी केले आहे.
...................
पोंभुर्ले येथे उद्या
जांभेकरांना वंदन
देवगड ः मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७८ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटण येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्यावतीने शुक्रवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता तालुक्यातील पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी दिली. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे (फलटण) मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी -बेडके व शिरवली (माणगांव) येथील विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे सचिव सुरेश गोखले उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोंभुर्लेचे माजी सरपंच सादिक डोंगरकर, सुधाकर जांभेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. या अभिवादन कार्यक्रमात प्रतिवर्षी संस्थेकडून देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारां’ची (२०२४) घोषणा होणार आहे. या अभिवादन कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, वृत्तपत्रप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com