सिंधुदुर्गासाठी ५८,७२४ पाठ्यपुस्तक संच

सिंधुदुर्गासाठी ५८,७२४ पाठ्यपुस्तक संच

सिंधुदुर्गासाठी ५८,७२४ पाठ्यपुस्तक संच

पहिली ते आठवीसाठी नियोजन ः शाळेच्या पहिल्या दिवशी होणार वितरण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचा संच दिला जातो. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ७२४ विद्यार्थ्यांसाठी ५८ हजार ७२४ पाठ्यपुस्तक संच जिल्ह्यात उपलब्ध होणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.
पहिली ते आठवीतील कोणताही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, तसेच शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची १०० टक्के उपस्थिती राहावी, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना शासनामार्फत राबविली जात आहे. या योजनेंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ७२४ मुलांना ५८७२४ पाठ्यपुस्तक संच दिले जाणार आहेत. हे पुस्तक संच विभागीय पाठ्यपुस्तके भांडार शिरोली येथून आज जिल्ह्याला प्राप्त झाली आहेत. तालुकानिहाय पाठ्यपुस्तक संच वितरणाचे काम आजपासून सुरू झाले असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत नवीन पाठ्यपुस्तक संच दिले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.
------------
(ग्राफ देतो)
तालुकानिहाय मिळणारी पुस्तके
तालुका*प्राप्त संच
सावंतवाडी*११०१६
मालवण*६१६९
कणकवली*१०३२३
कुडाळ*११७९७
देवगड*८८३०
वेंगुर्ले*४९८८
वैभववाडी*३००४
दोडामार्ग*२५९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com