जलस्त्रोत आटले, चिखल मिश्रित पाणी

जलस्त्रोत आटले, चिखल मिश्रित पाणी

२२ (पान ४ साठीमेन)

-rat१५p८.jpg-
२४M८३७६९
कोन्हवली ः डोंगरावरुन चिखल मिश्रीत पाणी आल्याने दूषित झालेले गावाचे जलस्त्रोत.
-----------

जलस्त्रोत आटले, चिखल मिश्रित पाणी

मंडणगडमध्ये पाणी टंचाई ; देवाचा डोंगर, सुर्ले गावी टँकर, कोन्हवलीला पाणी लालभडक

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ ः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातील ग्रामीण भागात उद्भवातील पाणी साठे आटल्याने पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्रतेने जाणवत आहे. गतवर्षी सरासरी पर्जनमान्य कमी झाल्याने समस्येची तीव्रता यंदा अधिक जाणवणार हे स्पष्ट होते, त्यामुळे पूर्वी कधीही पाणी ही अडचण नसणारी गावेही पाण्याच्या टँकरची मागणी करत आहेत.
तालुक्यात मानव निर्मित नैसर्गिक समस्येमुळे तालुक्यातील कोन्हवली गावाला कधी न्हवे ते टँकरची मागणी करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत भोळवली देवाचा डोंगर, सुर्ले या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच नारगोली व वाल्मिकीनगर या ठिकाणी मे महिन्यात सुरू असलेला टँकरचा पाणी पुरवठा स्थानिक पातळीवर पाणी उपलब्ध झाल्याने थांबवण्यात आला आहे. कोन्हवली गावात बारमाही उपलब्ध असणारे पाणी वळवाच्या पावसात डोंगर माथ्यावरुन चिखल मिश्रीत पाणी वाहून आल्याने पूर्णपणे लालभडक झाले आहे. त्यामुळे या गावावर प्रथमच टँकरचा पाणी पुरवठा मागण्याची वेळ आली आहे. त्याला डोंगरमथ्यावर सुरू असलेली चिरेखाण उत्खनन कारणीभूत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. मे महिना पूर्ण होण्यासाठी अजून दोन आठवडे असल्याने यादीत नसलेल्या गावातही नव्याने पाणी तुटवड्याची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. गावाच्या परिसरातून वाहणारे ओढे आता कोरडे पडले आहेत. मे महिन्यात तालुक्यात मोठ्या संख्येने मुंबईकर गावोगावी आपल्या कुटुंबासह आले आहेत. गावोगावी वार्षिक कार्यक्रम, ग्रामदेवतेच्या पूजा, लग्न सराई, क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक नळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com