धमालणीचा पार मार्गावरील डीपी हटवण्याची मागणी

धमालणीचा पार मार्गावरील डीपी हटवण्याची मागणी

३६ (पान ४ साठी)


-rat१५p१९.jpg-
P२४M८३८३९
रत्नागिरी : आठवडा बाजार येथून धमालणीच्या पाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डीपी पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात नवनीत स्टेशनर्सजवळ रस्त्यात असलेला पोल.
--------
धमालणीचा ‘डीपी’ हटवण्याची मागणी

रत्नागिरी, ता. १५ : शहरातील आठवडा बाजार रोड ते पटवर्धन हायस्कूल मार्गे धमालणीच्या पाराकडे जाणाऱ्या रस्त्यामधील डीपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा, अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस परशुराम उर्फ दादा ढेकणे यांनी नगरपालिका व महावितरणकडे केली.
आठवडा बाजार ८० फुटी रोड ते धमालणीच्या पाराकडे जाणाऱ्या रोडच्या सुरवातीला रस्त्यामध्ये डीपी पोल आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद होत असून वाहतुकीला, तसेच शाळेच्या मुलांना जाण्या-येण्यासाठी खूप त्रास होतो आहे. त्यामुळे डीपी पोल हटविण्यात यावे, पटवर्धन हायस्कूल प्रवेशद्वारासमोरील गटाराचे प्रलंबित काम पूर्ण करण्यात यावे, असे दादा ढेकणे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच नवनीत स्टेशनरीच्या समोरील रस्त्यामधील पोल हा खूप अडचणीचा ठरत असून त्यामुळे तेथे लहान-मोठे अपघात होतात. रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. परंतु, रस्त्यामध्येच पोल असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तो पोल हलविण्यात यावा व नागरिकांची गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी दादा ढेकणे यांनी केली आहे. निवेदन देताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, भटके विमुक्त जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे, योगेश हळदवणेकर, भालचंद्र साळवी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com