Fisheries Department
Fisheries Departmentesaka

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 43 नौकांवर मत्स्य विभागाची कारवाई; 81 लाख 59 हजारांचा दंड वसूल

१ जून ते ३१ जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी (Fishing) बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला आहे.
Summary

कोकणातल्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांच्या समुद्र हद्दीत अनेक वेळा परराज्यातील नौकांची घुसखोरी होते. त्यांची घुसखोरी येथील नौकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

रत्नागिरी : राज्याच्या जलदी क्षेत्रात बेकायदेशीर आणि एलईडीद्वारे मासेमारीवर मत्स्य विभाग (Fisheries Department) लक्ष ठेवून आहे. या हंगामात १ ऑगस्ट २०२३ ते १० मे २०२४ या कालावधीत ४३ मासेमारी नौकांवर (Boat) कारवाई करण्यात आली. या नौका चालकांकडून ८१ लाख ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

Fisheries Department
सांगली, मिरज Railway Station बॉम्बने उडविण्याची कसाबकडून धमकी; फोनमुळे पोलिस दलात उडाली खळबळ

१ जून ते ३१ जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी (Fishing) बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या काळात मासेमारी पूर्णतः बंद असते. कोकणातील समुद्रात दोन महिन्यांचा मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होते. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्यावर मच्छीमार बांधव स्वार होतो. मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होते.

कोकणातल्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांच्या समुद्र हद्दीत अनेक वेळा परराज्यातील नौकांची घुसखोरी होते. त्यांची घुसखोरी येथील नौकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच समुद्रात १२ नॉटीकलच्या आत एलईडी प्रकाशात मासेमारी करणाऱ्या अनेक मच्छीमारी नौकांचा वावर दिसतो. जानेवारीपासून राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजे १२ नॉटीकल मैलाच्या आत समुद्रात पर्ससीननेट मासेमारी करण्यास बंदी असते.

Fisheries Department
Koyna Dam : कोयना प्रकल्पातून विक्रमी वीज निर्मिती; पाण्याचे व्यवस्थापन ठरले उत्पादनाचे फलित

अशा अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर वेळोवेळी गस्तीद्वारे सहाय्यक मत्स्य आयुक्त विभाग नजर ठेवून असतो. १ ऑगस्ट २०२३ ते १० मे २०२४ दरम्यान ४३ नौकांवर कारवाई झाली. त्यातील ३९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. या नौकाधारकांवर ८१ लाख ५९ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्या दंडापैकी आतापर्यंत ५० लाख १९ हजारांचा दंड मत्स्य विभागाकडे जमा झाल्याची माहिती या विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com