‘सरप्राईज चेकिंग’मुळे
चालकांची पळापळ

‘सरप्राईज चेकिंग’मुळे चालकांची पळापळ

‘सरप्राईज चेकिंग’मुळे
चालकांची पळापळ
कणकवली ः जिल्हा वाहतूक शाखा व कणकवली पोलीस यांनी मंगळवारी फोंडाघाट बाजारपेठ व कणकवली बाजारपेठ येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सत्र राबविले. दोन्ही ठिकाणच्या या ‘सरप्राईज चेकिंग’मुळे अनेक वाहन चालकांची पळापळ झाली. फोंडाघाट बाजारपेठ येथे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने लावणे, ट्रिपल सीट, लायसन नसणे आदी कारणांसाठी २७ जणांवर मिळून १५ हजार ६०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कणकवलीत सकाळी १०.३० वा. पाच वाहन चालकांवर मिळून २ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कारवाईमध्ये जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस प्रकाश गवस, संदेश आबिटकर, कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, हवालदार विनोद चव्हाण, सचिन माने, भूषण सुतार, अनिल घाडी आदी सहभागी झाले होते.
----
इन्सुलीत २३ ला
साक्षात्कार दिन
बांदा ः इन्सुली-डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरात गुरुवारी (ता.२३) आत्म साक्षात्कार दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ६ वाजता काकड आरती, ८.३० वाजता श्रीं च्या पादुकांवर अभिषेक, ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री संत सोहिरोबानाथ भजन मंडळ बांदा यांचे भजन, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यंत पालखी सोहळा, रात्री ९.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ब्रह्म पदार्थ अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष विश्राम पालव, सचिव गुरुनाथ पेडणेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.
---
डोंगरपाल मठात
आज दरबार
बांदा ः प. पू. सद्‍गुरू श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात परमानंद महाराजांच्या उपस्थितीत उद्या (ता. १६) दरबार आयोजिला आहे. दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. यानिमित्ताने रात्री ९ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा संगीत सौभद्र हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सद्‍गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ डोंगरपाल यांच्यावतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com