‘फ्युचर पाठशाळा’ फायद्याची

‘फ्युचर पाठशाळा’ फायद्याची

83873
मालवण ः बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने आयोजित फ्युचर पाठशाळेत सहभागी विद्यार्थी.

‘फ्युचर पाठशाळा’ फायद्याची

मेघना जोशी ः मालवणातील उपक्रमाची उत्साहात सांगता

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ ः प्रत्येक यशस्वी माणसाकडे अपयश पचविण्याची ताकद असते. त्यामुळे अपयश पचविण्याची ताकद मिळविणे गरजेचे आहे. बॅ. नाथ पै सेवांगणने आयोजित केलेल्या फ्युचर पाठशाळेमुळे मुलांमध्ये यश मिळविण्याचे जसे सामर्थ्य निर्माण होण्यास मदत झाली आहे तसेच अपयश पचविण्याची ताकदही या पाठशाळेतून मिळेल, ही फ्युचर पाठशाळा मुलांच्या भावी आयुष्यात मार्गदर्शक म्हणून निश्चित काम करेल, असे प्रतिपादन येथील साहित्यिका मेघना जोशी यांनी येथे केले.
येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने गेले दहा दिवस चाललेल्या ‘फ्युचर पाठशाला’ या कार्यशाळेचा सांगता समारंभ साहित्यिका मेघना जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कार्यशाळेचे मार्गदर्शक व्हरस्टाईल एज्यूकेअर सिस्टीम, मुंबईचे संचालक डॉ. अजय दरेकर, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, टोपीवाला ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. मैत्रेयी बांदेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सानेगुरुजी वाचन मंदिराच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर, कौटुंबीक सल्ला केंद्राच्या समुपदेशक अदिती कुडाळकर, रुचिरा तारी आदी उपस्थित होते. प्रारंभी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शैलेश खांडाळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. अजय दरेकर, प्रा. मैत्रेयी बांदेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी उत्कृष्ट वक्ता चार्वी मोंडजर, ओजस घाडीगावकर, युगंधा खोबरेकर, शिवराज गवस तसेच इंप्रूव्हड स्पीच - शमी पेडणेकर, दिशांत शिवापूरकर, रघुनाथ कांडरकर तर पिजिंग विनर म्हणून आद्या ओरसकर, जुही गरगटे आणि गोल बुक विनर ओजस घाडीगावकर, सृष्टी हुनारी, चैताली आडवलकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी कार्यशाळेचा बेस्ट स्टुडंट म्हणून ओजस घाडीगावकर याला गौरविण्यात आले. यावेळी डॉ. गार्गी ओरसकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, सौ. आडवलकर यांनी तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. ऋतुजा केळकर यांनी आभार मानले.
---
मुलांनो, पुस्तकांवर लक्ष केंद्रित करा
सौ. जोशी म्हणाल्या, ‘‘या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विजेत्यांना तसेच सहभागी मुलांना प्रमाणपत्र आणि पुस्तक दिली आहेत. पुस्तकाबरोबर अनेक प्रमाणपत्रे आपल्याला प्राप्त होतील आणि म्हणून मुलांनी पुस्तकावर लक्ष केंद्रित करावे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोणती ना कोणती कारणे असतात, ती कारणे शोधली पाहिजेत. त्या कारणांपर्यंत आपण पोहचले पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com