मांडवी खाडीत बुडालेल्या
युवकाचा मृतदेह सापडला

मांडवी खाडीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

83883
यश देऊलकर

मांडवी खाडीत बुडालेल्या
युवकाचा मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ला, ता. १५ ः येथील मांडवी खाडीत पोहण्यासाठी उतरलेला मूळ दोडामार्ग मोरगाव येथील रहिवासी व सध्या गोवा म्हापसा येथे वास्तव्यास असलेला यश भरत देऊलकर (वय १६) याचा मृतदेह आज पहाटे मांडवी खाडीत आढळून आला. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तो याच खाडीत बुडाला होता.
यश हा काही दिवसांपूर्वी तळवडे (ता.सावंतवाडी) येथे आपल्या मामाकडे घरगुती कार्यक्रमासाठी आला होता. काल तो आपल्या चुलत मावशीसोबत वेंगुर्ले येथे फिरण्यासाठी गेला होता. येथील झुलत्या पूलानजीक असलेल्या पाण्यात तो व त्याचा चुलत भाऊ गौरव देवेंद्र राऊळ (वय १५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी त्याठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर यांनी गौरवला वाचवले. मात्र, यश हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला. काल दुपारपासून यशचा खादीपत्रात शोध सुरू होता. या शोधकार्यासाठी वेंगुर्ले पालिकेच्यावतीने लाईटची व्यवस्था केली होती. मध्यरात्री पर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती. अखेर आज पहाटे ४ वाजता यशचा मृतदेह ज्या ठिकाणी तो बुडाला होता त्याच ठिकाणी पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबत येथील पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यश हा गोवा येथून दहावीची परीक्षा देऊन मामाकडे आला होता. आज त्याचा निकाल जाहीर झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com