-आर्थिक नुकसानीच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

-आर्थिक नुकसानीच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

४७ (पान ३ साठी)
(टीप- सिंगल कॉलममध्ये घेऊ नये.)


-rat१५p२६.jpg-
२४M८३८८८
विक्रांत देसाई
----------

आर्थिक कारणातून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः मोबाइल कॅसिनो खेळातून मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आर्थिक नैराश्यातून शहरातील व्यावसायिक विक्रांत उर्फ राजा देसाई (वय ३७) याने विषारी द्रव्य पिऊन जीवन संपवल्याची घटना मंगळवारी (ता. १४) रात्री घडली.
राजा देसाई अनेकांना शहरामध्ये फिरताना दिसून आला होता. त्यानंतर तो दिसला नाही. त्याच्या मित्रपरिवारासह घरच्या लोकांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्याच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो फोन उचलत नसल्याने सगळीकडे शोधाशोध सुरू होती. अखेर मोबाईल लोकेशनवरुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो रानतळे येथील एका हापूस आंब्याच्या बागेमध्ये मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज सायंकाळी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा देसाई याला मोबाइलवर कॅसिनो खेळण्याचा नाद असल्याचे बोलले जात आहे. त्यातून त्याला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसल्याचे चर्चिले जात आहे. ज्या ठिकाणी विक्रांत याने आत्महत्या केली होती, त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळून आल्याचे बोलले जात आहे. याबाबत येथील पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी याची माहिती देण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com