राजापूर-बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडला

राजापूर-बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडला

बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडला

जानशीजवळील घटना; वनविभागाकडून अंत्यसंस्कार

राजापूर, ता. १५ : तालुक्यातील जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी महेश पटवर्धन यांच्या मालकीच्या कंपाऊंडच्या बाजूला रस्त्यालगत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाकडून या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वा.च्या सुमारास जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी रस्त्यालगत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसपाटील राजेंद्र कृष्णा तांबे यांनी परिमंडळ वनअधिकारी यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर येथील वनपाल सदानंद घाटगे यांनी, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. बिबट्याचा बछडा रस्त्याच्याकडेला मृतावस्थेत पडला होता. मृत बिबट्या बछडा हा मादी असून, त्याचे वय साधारण तीन महिने असल्याचे वनविभागाने सांगितले. बिबट्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वनअधिकारी यांनी केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर बछडा उपासमारीमुळे मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई व सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, नीलेश म्हादये उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com