चोरटे स्थानिक, माहितगार असण्याची शक्यता

चोरटे स्थानिक, माहितगार असण्याची शक्यता

पान १

८३८९२

चोरटे माहीतगार असण्याची शक्यता
मिठगवाणेतील पतसंस्थेत चोरी ः लॉकर कापला गॅस कटरने
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक सहकारी पतपेढीच्या शाखेत जबरी चोरी झाली. चोरट्यांनी मिठगवाणे शाखेतून संस्थेच्या म्हणण्यानुसार सुमारे ९० लाख रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. पोलिसांकडून श्‍वानपथकही पाचारण केले होते; मात्र श्‍वान त्याच परिसरामध्ये घुटमळत होते. त्यामुळे चोरटे स्थानिक आणि माहीतगार असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रीदेव अंजनेश्‍वर मंदिर परिसरातील इमारतीमध्ये श्रमिक सहकारी पतपेढीची मिठगवाणे शाखा आहे. येथेच ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफिसही आहे. या पतपेढीसह शासकीय कार्यालयामध्ये लोकांची दिवसभरामध्ये नेहमीच गर्दी असते. रात्री या परिसरामध्ये फारसं कोणीही नसतं. याचा फायदा चोरट्यांनी उचलला. चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान नाटे पोलिसांसमोर ठाकले आहे.
श्रमिक सहकारी पतपेढीच्या मिठगवाणे शाखेमध्ये अणसुरे, दांडे, मिठगवाणे, माडबन, तुळसुंदे आदी गावांमधील लोकांचे व्यवहार असतात. काल (ता. १४) सकाळी या शाखेच्या कर्मचाऱ्‍यांनी कार्यालय उघडले, तेव्हा पतपेढीमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील सोन्याचा ऐवज लांबविला. सोमवार (ता. १३) सायंकाळी ते मंगळवार (ता. १४) सकाळी ९.१५ वा. या कालावधीमध्ये ही धाडसी चोरी झाली आहे. श्रमिक सहकारी पतपेढी शाखा मिठगवाणेचे शाखाधिकारी जगन्नाथ रायकर यांनी काल सायंकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार नाटे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज पतपेढीचे कर्मचारी आणि संचालक यांच्याकडून माहिती घेतली जात होती. या घटनेची माहिती नाटे पोलिसांना समजताच नाटेचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदारी सहकाऱ्‍यांसमवेत तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णीही तत्काळ दाखल झाले.

यावर मारला डल्ला
चोरलेला एकूण ऐवज ९० लाखांचा
२०० तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने
सीसीटीव्ही फुटेजसाठीचा डीव्हीआर
दोन सीसीटीव्ही कॅमेरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com