जानवली पुलाचे काम अंतिम टप्प्यात

जानवली पुलाचे काम अंतिम टप्प्यात

kan161.jpg
M83942
जानवली : येथील नदीपात्रातील पुलाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.

जानवली पुलाचे काम अंतिम टप्प्यात
आठ कोटी आठ लाख निधी मंजूर; कृत्रिम धबधब्याचीही उभारणी
कणकवली, ता.१६ : कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या जानवली नदीपात्रातील मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जून अखेर पर्यंत या पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीला खुला करण्याचे नियोजन केले आहे. या पुलासाठी ८ कोटी ८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जानवलीसह लगतच्या गावांना कणकवलीत येण्यासाठी मुंबई गोवा राष्‍ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. मात्र आता जानवली नदीवरील नव्या पुलामुळे येथील रहिवाशांना जवळचा आणि नवा मार्ग खुला झाला आहे. कणकवली शहरवासीयांना देखील जानवली, साकेडी, हुंबरट, करूळ आदी गावांमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्‍ध होणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून जानवली नदीपात्रात पूल व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. वर्षभरापूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली नगरपंचायतीला भेट दिल्‍यानंतर येथील नदीपात्रातील पुलासाठी तातडीने सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्‍यानुसार सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तांत्रिक आराखडा पाठवला. डिसेंबर २०२४ मध्ये या पुलासाठी हिवाळी अर्थसंकल्‍पात तरतूद करण्यात आली. तर ९ मार्च २०२४ रोजी या पुलाच्या प्रत्‍यक्ष कामाला सुरवात झाली.
जानवली नदीपात्रात उभारणी होत असलेला हा पूल ८० मिटर लांब आणि ११.६७ मिटर रूंदीचा आहे. जून अखेरपर्यंत हा पूल पूर्ण होऊन वाहतूकीस खुला करण्याचे नियोजन असल्‍याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. दरम्‍यान या पुलालगत नगरपंचायतीच्यावतीने कृत्रिम धबधबा उभारणीचेही काम सुरू केले आहे
जानवली पुलापासून काही अंतरावर संपूर्ण शहराला जोडणारा रिंगरोड आहे. त्‍यामुळे पुढील काळात शहराच्या कुठल्‍याही भागातून या पुलापर्यंत येणे नागरिकांना शक्‍य होणार आहे. तर बहुतांश वेळा गांगो मंदिर ते महामार्गावरील जानवली पूल या दरम्‍यान सेवा रस्ता अरूंद असल्‍याने वाहतूक कोंडी होते. त्‍यावेळी वाहन चालकांना शहरात ये जा करण्यासाठी नवा जानवली पूल महत्‍वाचा ठरणार आहे. या पुलामुळे शहरातील टेंबवाडी, फौजदारवाडी, निम्मेवाडी ते करंजे गाव हद्दीपर्यंत तसेच जानवली गावच्याही विकासाला मोठी चालणार मिळणार असल्‍याची अपेक्षा माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी व्यक्‍त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com