फलकामुळे होणारे क्रिडांगणाचे विद्रूपीकरण थांबवा

फलकामुळे होणारे क्रिडांगणाचे विद्रूपीकरण थांबवा

१३ (टूडे २ साठी)

- rat१६p६.jpg-
२४M८३९५६
रत्नागिरी ः मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देताना रत्नागिरीकर

क्रिडांगणाचे विद्रूपीकरण थांबवा

निलेश आखाडे ; फलकाबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः जाहिरात फलक उभारल्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाचे होणार विद्रूपीकरण थांबवा, अशी मागणी भाजपच्या आयटी सेलचे जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन मुख्याधिकारी तुषार बाबर यांना देण्यात आले. या वेळी पर्शुराम ढेकणे, योगेश हळदवणेकर, ऋषिकेश केळकर, साळवी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण येथे जाहिरातीसाठी फलक लावण्यात येत असून त्यामुळे क्रिडांगणाची शोभा कमी होणार आहे. तसेच क्रीडांगणाची उभारणी करताना खेळते आणि मोकळे वातावरण कसे राहील याचा अभ्यास करून क्रिडांगण बांधण्यात आले आहे. क्रिडांगणावर जाहिरात फलक ज्या ठिकाणी लावण्यात आले आहेत, तेथे पूर्वीपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण असे नाव पेंट केले होते. मागील काही वर्षात क्रिडांगणाला रंग काम करताना हे नाव झाकण्यात आले आहे. जाहिरात फलकांमुळे ही सर्व बाजू झाकली जाणार आहे. तरी प्रशासनाने या बाबत निर्णय घेऊन क्रीडांगणाचे नाव ठळक शब्दात पुन्हा एकदा लिहावे व विद्रुपीकरण थांबवावे. तसेच रत्नागिरी शहरातील सर्व जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा अन्यथा यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, अशी मागणी भाजपाचे आयटी सेल जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी मंगळवारी (ता. १४) मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com