धरणांतील पाणी ना शेतीसाठी ना पिण्यासाठी

धरणांतील पाणी ना शेतीसाठी ना पिण्यासाठी

३ (टुडे पान १ साठी, अॅंकर)


-rat१६p१२.jpg -
P२४M८३९८८
राजापूर ः जुवाठी धरण.
-rat१६p१३.jpg ः
OP२४M८३९८९
कोंड्ये धरणाचा कोरडा परिसर.
-------------

सिंचनासह टंचाईवर उपाय ----भाग २---लोगो

धरणातील पाणी ना शेतीसाठी ना पिण्यासाठी

गाळाचा मोठा संचय; पाणीपुरवठ्यापूर्वी बांधकामांना लागली गळती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः तालुक्यातील अकरा धरणांची कामे पूर्ण होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला दिसत आहे; मात्र, या धरणांच्या कालव्यांची अद्यापही कामे झालेली नाहीत. सहा धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला असून, त्यामध्ये पाणी कमी अन् गाळ जास्त असे चित्र दिसत आहे. तीन धरणांच्या बांधकामांना पाणीपुरवठ्यापूर्वी गळती लागल्याचे चित्रही आहे. पाच धरणांच्या कालव्यांची कामे सुरू आहेत; मात्र, त्या कामांमध्ये म्हणावा तितकासा वेग दिसत नाही. या साऱ्‍यामुळे काही मोजक्या गावांमधील शेतकऱ्‍यांचा अपवाद वगळता धरणांतील पाणी ना शेतीसाठी ना पिण्यासाठी उपयोगी.
तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पासह चिंचवाडी धरण (पांगरे), चव्हाणवाडी (ताम्हाणे), काकयेवाडी, वाटूळ, वाळवड (मूर), ओझर, तळवडे, झर्ये, पाचल दिवाळवाडी, परूळे, सौंदळ बारेवाडी, कोंड्ये, जुवाठी, कशेळी, गोपाळवाडी आदी धरणांची कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यःस्थितीमध्ये या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. पाच धरणांची उभारणी केवळ त्या परिसरामध्ये पाणी जिरविण्यासाठी आणि जमिनीखाली नैसर्गिक जलस्रोत वाढवण्याच्या उद्देशाने झाला असला तरी पाच धरणांमधील पाणी कालव्यांद्वारे जलशिवारांना देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी दहा धरणांच्या बांधकामाची कामे पूर्ण झाली असली तरी त्यांच्या कालव्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत. पाच धरणांमधील पाणी परिसरातील गावांना पुरवण्यासाठी कालवे काढण्याची कामे सुरू आहेत; मात्र, त्या कामांना म्हणावी तशी गती दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा ना शेतीसाठी उपयोग ना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो. त्याला रखडलेले भूसंपादन, लोकांचा विरोध, शासनाकडून निधीची तरतूद अन् उपलब्धता आदी कारणे आहेत. जोपर्यंत कालवे काढून धरणातील पाणीसाठा नियोजित ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत धरण उभारणीचा उद्देशही सफल होताना दिसणार नाही.
------
चौकट
गाळ, गळतीवर नाहक खर्च
धरणांमधील पाण्याचा उपयोग होण्यापूर्वी ती गाळाने भरली आहेत. या धरणांतील कालव्यांची कामे पूर्ण होण्यास आणखीन सुमारे पाच वर्षाहून अधिक काळ जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत धरणामध्ये साचलेला गाळ आणि गळती काढण्यासाठीही नाहक कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com