स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ग्रंथालयांचा लाभ घ्या

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ग्रंथालयांचा लाभ घ्या

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी
ग्रंथालयांचा लाभ घ्या
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध आहे. या ग्रंथालयामध्ये युपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध आहेत. या ग्रंथालय सेवेचा निशुल्क लाभ इच्छुक उमेदवार घेऊ शकतात, अशी माहिती सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज व अद्यावत हॉल, स्वच्छ व शांत वातावरण, मुलींसाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष, ग्रुप स्टडीसाठी कक्ष, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, नामांकित वर्तमान पत्रे व मासिके, संगणक सुविधा, वाय-फाय सुविधा उपलब्ध आहेत. अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग प्रशासकीय संकुल, तळ मजला ब्लॉक-अ, सिंधुदुर्गनगरी (ता. कुडाळ) येथे संपर्क साधावा.
-------------
आंबोली सैनिक स्कूलमध्ये
प्रवेश प्रक्रिया सुरु
सावंतवाडीः आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये सहावी व अकरावीच्या विज्ञान शाखेच्या चालू वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाबरोबर सैन्यदल प्रवेश परिक्षा, एनडीए, जेईई, एनईईटी, एमएमटी, सीईटी आदी परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिस मॅन असोशिएशन यांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या या शाळेत आदर्श गुरूकुल पध्दतीने निवासी सैनिकी शिक्षण दिले जाते. संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि ग्रंथालय देण्यात आले आहे. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षीत अनुभवी शिक्षण आणि प्रशिक्षक उपलब्ध करुन दिले आहेत. या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी तसेच पालकांनी संस्थेशी संपर्क साधावा.
-----------------
दाणोलीत आजपासून
दत्तयागाचे आयोजन
ओटवणेः मुंबई केळवा रोड येथील श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम यांच्यावतीने १७ व १८ ला दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात श्री दत्तयागाचे आयोजन केले आहे. यानिमित्त उद्या सकाळी ७:३० वाजता संकल्प, गणेश पूजन, त्यानंतर दहा हजार जप सुरू, दुपारी १ वाजता नैवेद्य त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे. शनिवारी (ता.१८) सकाळी ७ वाजता पुण्यवाहन, नांदी श्राद्ध, त्यानंतर नवग्रह पूजन, हवन व दत्तयाग सुरू, दुपारी १२:३० वाजता पूर्णाहुती, त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम यांच्यावतीने करण्यात आले आहे.
-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com