अखेर रहाटाघरातील प्रवाशांची परवड थांबली

अखेर रहाटाघरातील प्रवाशांची परवड थांबली

१० (पान ५ साठी, मेन)


-rat१६p२.jpg-
२४M८३९३९
रत्नागिरी ः रहाटाघर बसस्थानकाच्या बाहेर या रस्त्यावर लागत होत्या गाड्या.
-rat१६p३.jpg-
P२४M८३९४०
काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर फलाटाला लागलेल्या गाड्या.
-rat१६p४.jpg-
२४M८३९४१
रणरणत्या उन्हातून सुटका झालेले प्रवासी निवाऱ्याला बसची वाट बघताना.
-----------

रहाटाघरातील प्रवाशांची परवड थांबली

फलाटावर लागल्या एसटी बसेस; रणरणत्या उन्हातून प्रवाशांची सुटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : रहाटाघर बसस्थानकाच्या कामामुळे रस्त्यावर आलेल्या प्रवाशांची परवड अखेर थांबली आहे. बसस्थानकातील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रस्त्यावर लागणाऱ्या एसटी बसेस आजपासून आत फलाटावर लागण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हामध्ये एसटीची वाट बघत बसणाऱ्या प्रवाशांना अडीच महिन्यांनी दिलासा मिळाला.
मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचे काम रखडले आहे. त्यामुळे सर्व एसटी वाहतूक जुन्या रहाटाघर बसस्थानकातून सुरू आहे. या बसस्थानकाच्या कामामुळे प्रवाशांना एसटीसाठी बसस्थानकाच्या पुढे रस्त्यावर उभे राहावे लागते. प्रवाशांची ही अवस्था असतानाच त्यातच रहाटाघरच्या नूतनीकरणाचे काम काढण्यात आले. कोट्यवधीचे हे काम सुरू केल्यामुळे फलाटाला लगणाऱ्या एसटी गाड्या बाहेर रस्त्यावर लावल्या जात होत्या. त्या भुतेनाका येथून फिरून येऊन रस्त्याच्या कडेला लागत होत्या. यामुळे कोणती गाडी कुठे लागली आहे, हे प्रवाशांना समजत नव्हते. प्रवाशांची गाडीसाठी प्रचंड फरफट होत होती. कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना थांबावे लागत होते.
गेली दोन ते अडीच महिने प्रवाशांची ही परवड सुरू होती. या दरम्यान रहाटाघर बसस्थानकेचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात आले. येण्या-जाण्याचे मार्ग दुरुस्त करण्यात आले. इमारतीची दुरुस्ती सुरू आहे. एमआयडीसीकडून नूतनीकरण सुरू आहे. दोन्ही बसस्थानकांचे काम एकदम काढल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
----------

अजून काम अपूर्ण
रहाटाघर बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम अजून बाकी आहे. प्रवाशांचे हाल थांबण्यासाठी एसटी महामंडळाने एसटी बसेस फलाटावर लावण्यास सुरवात केली. अजून प्लास्टर, रंगरंगोटी, लाद्यांचे काम शिल्लक आहे.
.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com