रुग्णालयातील कर्मचारी रंगले सांस्कृतिक कार्यक्रमात

रुग्णालयातील कर्मचारी रंगले सांस्कृतिक कार्यक्रमात

२९ (पान ५ साठी)


-rat१६p२७.jpg-
२४M८४०२४
ओळी ः परिचारिका दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी आयएमएकडून येथील सावरकर नाट्यगृहात रंग माझा वेगळा कार्यक्रमात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
-------------
रुग्णालयातील कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रमात

परिचारिका दिन ; कृतज्ञता सोहळ्यात गौरव

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिकांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रंग माझा वेगळा हा विविध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उत्साहात झाला.
कोरोना काळामध्ये सर्व परिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून सेवा दिली. या काळात प्रत्येकजण आपल्या घरी सुरक्षित होता; परंतु या सर्व नर्सेस व हॉस्पिटलचा स्टाफ आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची काळजी घेत झटत होता. रुग्णांची व्यवस्थित काळजी घेण्यामध्ये, त्यांना योग्य सेवा देण्यामध्ये, रुग्ण बरे होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. नर्सिंग महाविद्यालयेही अशा नर्सेसची भावी पिढी तयार करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना विरंगुळ्याचे काही क्षण देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
रत्नागिरीतील विविध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध कलागुण सादर केले. विविध नृत्ये आणि मूकनाट्य यांच्या उत्कृष्ट सादरीकरणातून मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी सर्व रुग्णालयीतल सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्व हॉस्पिटलच्या मेट्रन तसेच सर्व नर्सिंग महाविद्यालयाचे मुख्याध्यपक, मुख्याध्यापिका यांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. अलिमियाँ परकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ, अतुल ढगे, सचिव डॉ. योगेश सूर्यवंशी, खजिनदार डॉ, निकुंज भट, माजी अध्यक्ष डॉ. तोरल शिंदे आदी उपस्थित होते.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com