-राजापुरातील १ हजार १८१ शेतकऱ्यांचे आधार सिडींग अपुरे

-राजापुरातील १ हजार १८१ शेतकऱ्यांचे आधार सिडींग अपुरे

८ (पान ५ साठी, अॅंकर)

एक हजार १८१ शेतकऱ्यांचे ‘आधार सिडींग’ अपुरे

राजापूर तालुका ; किसान सन्मानच्या लाभापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शासनाने संबंधित लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे; मात्र, अद्यापही अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी अपडेट केलेली नाही. तालुक्यातील पात्र असलेल्या १८ हजार ५५८ लाभार्थ्यांपैकी अद्यापही २८९ शेतकऱ्‍यांनी ई-केवायसी अपडेट तर १ हजार १८१ शेतकरी लाभार्थ्यांनी आधार सिडींग केलेले नाही. ज्या शेतकऱ्‍यांकडून वेळेमध्ये ई-केवायसी अपडेट आणि आधार सिडींग केले जाणार नाही, अशा शेतकऱ्‍यांना भविष्यामध्ये पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची वा अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात; मात्र काहींनी बनावट कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेतल्याची बाब मध्यंतरी पुढे आली होती. अशा प्रकारांना आळा बसावा आणि पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्‍या बनावट लोकांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाने अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी अपडेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही अनेक शेतकऱ्‍यांनी ई -केवायसी पूर्ण केलली नाही.
तालुक्यातील बहुतांश लाभार्थी मुंबईला राहत असल्याने त्यांचे ई-केवायसी अपडेट करणे प्रलंबित होते; मात्र गणेशोत्सवानिमित्ताने लाभार्थी गावी येण्याची शक्यता ओळखून कृषी विभागाने गतवर्षी शेतकऱ्‍यांची जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यातून रखडलेली ई -केवायसी अपडेट करण्याचे प्रयत्न केले होते. त्याला लाभार्थी शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसत नाही. भविष्यामध्ये ई -केवायसी अपडेट करण्याचे प्रलंबित राहिल्यास संबंधित शेतकऱ्‍यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com