चिपळूण ः सावर्डे परिसरात वादळी पावसाचा तडाखा

चिपळूण ः सावर्डे परिसरात वादळी पावसाचा तडाखा

(टीप- ही बातमी खेडच्या बातमीच्या शेजारी किंवा खाली घ्यावी.)

-ratchl१६२.jpg
84091
सावर्डे : वादळी वाऱ्याने उडालेले पार्किंगशेडचे पत्रे.

-ratchl१६२.jpg
84092
सावर्डे : धनगरवाडीत गोठा कोसळून चार जनावरे दगावली.


सावर्डे परिसरात वादळी पावसाचा तडाखा

कौले, पत्रे उडाले; तीन तास वीजपुरवठा खंडित

चिपळूण, ता. १६ : शहरासह तालुक्यातील सावर्डे, पूर्व विभाग, पंधरागांव व खाडीपट्ट्यात गुरुवारी (ता. १६) दुपारी साडेतीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमशान घातले. या पावसात अनेक ठिकाणी घरांवर वृक्ष व फांद्या कोसळल्या तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे व कौले उडून नुकसान झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी विद्युतवाहिन्या व पोलवर झाडांच्या फांद्या कोसळून नुकसान झाले. परिणामी, तीन तास शहरासह परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
मागील आठवड्यात येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये तालुक्यातील रामपूर, कोळकेवाडी, कामथे, खेर्डी आणि पोफळी येथील सहा घरांचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाचा सर्वाधिक फटका सावर्डे, दसपटी तसेच चिपळूण शहर परिसराला बसला. सावर्डे धनगरवाडी येथे वादळामुळे बबन बाबू बावदाने यांचा गोठा कोसळून चार जनावरे दगावली आहेत. त्यांचे एकूण पाच लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले तर सावर्डे बौद्धवाडी येथील योगेश सावंत यांच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. अडरे येथील मनीषा मोहन बद्रिके यांच्या घरावर झाड कोसळून ३५ हजार रुपये, राजेंद्र धनगराज गिरी यांच्या घराचे २५ हजार रुपये, कापसाळ येथील अरुण तुकाराम केळसकर यांच्या घराचे पाच हजार पाचशे, कापरे येथील भार्गव केरू तामुंडकर यांच्या घराचे १३ हजार ५०० रुपये, कौंढरताम्हाणे येथील भिकाजी बाळ साळुंखे यांच्या घराचे १ लाख २० हजार रुपये, पालवण येथील प्रभाकर नानू भूवड यांच्या घराचे ५ हजार रुपये व रामचंद्र महादेव भुवड यांच्या घराचे १५ हजार रुपये, हडकणी येथील प्रदीप काशिनाथ आग्रे यांच्या घराचे ६ हजार ५०० रुपये असे घरांचे एकूण २ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. रामपूर येथील महेश गंगाराम सावर्डेकर यांच्या गोठ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. टेरव येथील चंद्रकांत बावदाने व रामचंद्र बावदाने यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.
------
चौकट
दोघेजण बालंबाल बचावले
प्रकाश कदम यांच्या बागेचेही वादळीवाऱ्याने मोठे नुकसान झाले. शहरातील गोवळकोट रोड येथील श्री देवी करंजेश्वरी कमानीजवळ झाड पडल्यामुळे विद्युतखांब कोसळला. तसेच या भागातील विद्युत वाहिन्याही तुटल्या. रस्त्यावर झाड कोसळल्याने या भागातील वाहतूक काही वेळ बंद पडली होती. बाजारपेठेतील स्वामी कॉप्लेक्सचे पत्रे उडून नुकसान झाले. पत्रे उडाले असताना दोघेजण त्यातून बालंबाल बचावले. येथील पंचायत समितीसमोरील सर्व्हिस रोडवरही झाडांच्या फांद्या कोसळल्याने मार्ग काही वेळ बंद पडला होता. शहरातील परशुराम नगर येथील इंदिरा अपार्टमेंटमध्ये पावसाचे तुंबलेले पाणी शिरले. याशिवाय शहरातील अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com