बस चालकाला मारहाण, २ संशयिताविरोधात गुन्हा

बस चालकाला मारहाण, २ संशयिताविरोधात गुन्हा

४२ (पान ३ साठी)

बस चालकाला मारहाण, दोघांवर गुन्हा

परस्परविरोधी तक्रारी ; दापोलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १६ : दापोली-कादिवलीमार्गे आडे या बसच्या चालकाला मारहाण केल्याप्रकरणी २ संशयिताविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक बाळासाहेब रामनाथ देवढे (वय ४३) हे १५ मे रोजी दुपारी दापोली कादिवलीमार्गे आडे ही बस (एमएच-१४-बीटी-२५३८) घेऊन आडे येथे जात होते. बस ५.४५ वाजण्याच्या सुमारास कादिवली कॅंटीन बसथांब्यावर पाठीमागून चारचाकीतून आलेल्या संशयित सुनील भिलू राठोड व सुनीता सुनील राठोड यांनी एसटीसमोर त्यांचे वाहन आडवे लावले आणि चालक देवढे यांना शिवीगाळ केली. चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून चालक देवढे यांचा शर्ट धरून त्यांना बसखाली उतरवून मारहाण केली. सुनीता राठोड यांनी दगडाने देवढे यांना मारहाण केली. या प्रकरणी चालक देवढे यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. याच प्रकरणात सुनीता सुनील राठोड यांनीही चालक देवढे यांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सुनील राठोड व सुनीता राठोड हे त्यांच्या चारचाकीने दापोली ते कांगवई असा प्रवास करत असताना बसचालकाने त्यांच्या वाहनाला पुढे जाऊ दिले नाही. जेव्हा कादिवली येथे बस थांबली तेव्हा आम्ही बसचालक यांना आम्हाला पुढे का जाऊ दिले नाही, याची विचारणा केली असता त्यांनी सुनीता राठोड यांना मारहाण केली. तसेच सुनील राठोड यांनाही मारहाण केल्याची तक्रार सुनीता राठोड यांनी दिली आहे.
----------------------------
चौकट
रात्री बसेस सुटण्यास खोळंबा
एसटीचे चालक बाळासाहेब रामनाथ देवढे यांना कामावर असताना मारहाण झालेली असतानाही दापोली पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास वेळकाढूपणा केल्याने दापोली बसस्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांनी १५ ला रात्री आंदोलन करत बसस्थानकाबाहेर बसेस पडू दिल्या नाहीत. जोपर्यंत पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्यावर चालक देवढे यांना मारहाण झाल्याची तक्रार घेतल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे दापोली बसस्थानकातून रात्री बसेस सुटण्यास खोळंबा झाला.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com