वेंगुर्ले आगार नूतनीकरण काम निकृष्ट

वेंगुर्ले आगार नूतनीकरण काम निकृष्ट

swt1616.jpg
84112
वेंगुर्ले ः येथील एसटी आगाराच्या निकृष्ट कामाची पाहणी करताना प्रसन्ना देसाई. सोबत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेचे पदाधिकारी.

वेंगुर्ले आगार नूतनीकरण काम निकृष्ट
कामगार संघटना ः निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ ः येथील आगाराचे सद्यस्थितीत सुरू असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणि निकृष्ट दर्जाचे आहे. चुकीचे अंदाजपत्रक असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कामाची पाहणी करत त्यांनी काम बंद पाडले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील सर्वच एसटी आगाराच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. यात सुमारे १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे वेंगुर्ले एसटी आगाराच्या नूतनीकरणाचे सुरू आहे. हे काम निकृष्ट असल्याचा आरोप भाजप प्रणित सेवा शक्ति संघर्ष कामगार संघाने करत आज या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्य एसटी डेपो येथे घालण्यात आलेले पत्रे चुकीच्या पद्धतीने घालण्यात आले असून ते निकृष्ट आहेत. तसेच जुने असलेल्या लोखंडी छप्परालाच कलर काढण्यात आला आहे. यात काही ठिकाणी हे लोखंड सडलेल्या स्थितीत आहे. तसेच वर्कशॉपच्या ठिकाणी करण्यात येणारे काँक्रीटीकरणाचे काम सुद्धा चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या एसटी आगाराच्या निकृष्ट कामाबत दोन दिवसांपूर्वी आगार प्रमुख यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. आज याची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या आगारांचे जे स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे याला आमचा विरोध असून याबाबत जोपर्यंत एसटी आगाराचे विभागीय नियंत्रक यांच्याशी चर्चा होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष देसाई यांनी दिला. यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय केकरे व कनिष्ट अभियंता गिरीजा पाटील यांच्या सोबत या संपूर्ण कामाची पाहणी करत जोपर्यंत विभागीय नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी बैठक होत नाही, तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी संघटना उपाध्यक्ष भाऊ सावळ, आगार सचिव दाजी तळणेकर, सल्लागार मनोज दाभोलकर, विभागीय सहसचिव महादेव भगत, महिला संघटक सेजल रजपूत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com