पान एक-मान्सूनपुर्व पावसाचा सिंधुदुर्गला तडाखा

पान एक-मान्सूनपुर्व पावसाचा सिंधुदुर्गला तडाखा

टीपः swt1619.jpg व swt1620.jpg मध्ये फोटो आहे.
84126
करूळ ः येथे गुरुवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतमळ्यांमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी, अशी स्थिती निर्माण झाली होती.

टीपः swt1621.jpg मध्ये फोटो आहे.
84127
मांगवली ः परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला. अनेक घरांची पडझड झाली.

टीपः swt1622.jpg मध्ये फोटो आहे.
84128
खारेपाटण ः येथील मच्छीमार्केट परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

टीपः swt1624.jpg मध्ये फोटो आहे.
84130
सोनाळी ः येथे रस्त्यावर झाड कोसळले.


मॉन्सूनपूर्व पावसाचा सिंधुदुर्गला तडाखा

अनेक ठिकाणी पडझड; वैभववाडी, कणकवलीसह खारेपाटणला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ ः मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने आज जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटांसह जिल्ह्याच्या अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. वैभववाडी, कणकवली, खारेपाटण परिसरातील अनेक गावांमध्ये मोठी पडझड झाली. काही इमारतींच्या छप्पराचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी विजखांब, विजवाहिन्या उन्मळून पडल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र खारेपाटण परिसरात दिसून आले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी एक वाजल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून विजांचा गडगडाट आणि वादळीवारा सुरू झाला. डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे, अरूळे यासह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. करूळला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. या गावात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था पाहायला मिळाली. शेतमळे पावसाच्या पाण्याने ओसडूंन वाहत होते. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार देखील झाले. उंबर्डे-वैभववाडी मार्गावरील सोनाळी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. कुसुरमध्ये देखील विजखांब रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वादळाने अनेक घरांची, गोठ्यांच्या छप्पराचे नुकसान झाले. विजवाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यत तालुक्यातील विजपुरवठा खंडित होता. भुईबावडा, मांगवली, उंबर्डे या परिसरात देखील पावसाचा जोर अधिक होता. मांगवली गावांमध्ये सहा ते सात घरांची वादळामुळे पडझड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला.
कणकवली तालुक्याला देखील वादळीवाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळीवारा आणि पावसाने झोडपले. कळसुली बौध्दवाडीला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये काही घरांचे नुकसान झाले. विजखांब कोसळून देखील नुकसान झाले आहे. हळवलमध्ये घरावर झाड कोसळल्याचा प्रकार घडला. खारेपाटण परिसरात जोरदार पाऊस झाला. या परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले. खारेपाटण मच्छीमार्केट परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे पहिल्याचा पावसात खारेपाटणवासीयांची दाणादाण उडाली. कणकवली तालुक्यातील हरकुळ ब्रुदुकला वादळाचा मोठा तडाखा बसला. या गावातील शेखवाडी, गावठणवाडीतील २० हून अधिक घरांचे वादळाने नुकसान झाले आहे. जिल्हयातील सावंतवाडी, कुडाळ, तालुक्यात देखील पावसाच्या सरी बरसल्या. मालवण तालुक्यात हलका पाऊस झाला.
--------------
चौकट
कणकवली विभाग अंधारात
पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसलेल्या कणकवली, वैभववाडी तालुक्यात महावितरणचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी महावितरणचे विजखांब, विजवाहिन्यावर झाडे कोसळली आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील विजपुरवठा खंडित झाला आहे. हा विजपुरवठा आज सुरू होण्याची शक्यता कमी असून हा विभाग अंधारात राहण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com