मान्सूनपूर्व पावसाने वैभववाडीला झोडपले

मान्सूनपूर्व पावसाने वैभववाडीला झोडपले

मान्सूनपूर्व पावसाने
वैभववाडीला झोडपले
वैभववाडीः मान्सूनपूर्व पावसाने आज तालुक्याला झोडपले. तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे, अरूळे यासह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. करूळला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. या गावात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था पाहायला मिळाली. शेतमळे पावसाच्या पाण्याने ओसडूंन वाहत होते. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार देखील झाले. तालुक्याला आज दुपारी वादळीवारा आणि विजांच्या गडगडाटाने झोडपून काढले. उंबर्डे-वैभववाडी मार्गावरील सोनाळी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतुक काही काळ ठप्प झाली. कुसुरमध्ये देखील विजखांब रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वादळाने अनेक घरांची, गोठ्यांच्या छप्पराचे नुकसान झाले. विजवाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यत तालुक्यातील विजपुरवठा खंडित होता. भुईबावडा, मांगवली, उंबर्डे या परिसरात देखील पावसाचा जोर अधिक होता. मांगवली गावांमध्ये सहा ते सात घरांची वादळामुळे पडझड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com