

१४ (टूडे २ साठी)
सहकारातील हस्तक्षेप रोखण्यासाठी
निर्बंध हवेत ः चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः सहकारात राजकारण मारक ठरणार असेल तर सहकाराला ते शाप ठरेल. तेव्हा सहकारातील राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी निर्बंध यावेत, अशी अपेक्षा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच सहकारात शिक्षण प्रशिक्षणातून प्रबोधनाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
चिपळूण नागरीतर्फे आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, प्राचार्य डी. सी. देशपांडे, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका स्मिता चव्हाण आदी उपस्थित होते. ते म्हणाले, चिपळूण नागरीने स्वयंरोजगारातून रोजगार निर्मिती ब्रीदवाक्य सुरवातीपासून जपले आहे. सहकारात व्यापक दृष्टीने काम होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. चिपळूण नागरी सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी काम करीत आहे. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला ७ ते ८ हजार दूध उत्पादक शेतकरी जोडले गेले आहेत. हे काम अधिक व्यापक व्हावं, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. येत्या वर्षभरात १० हजार बेरोजगारांना या प्रकल्पाशी जोडण्याचा मानस आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेले सावर्डे धनगरवाडी येथील बबन बावदाने यांना चिपळूण नागरीतर्फे मदतीचा हात देण्यात आला. या वेळी ठेवीदार, छोटे- छोटे व्यावसायिक आदींचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.