जेष्ठ कवी सुरेश भट यांनी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली

जेष्ठ कवी सुरेश भट यांनी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली

kan231.jpg
85296
कणकवलीः येथील नगरवाचनालयातील गझल लेखन व गायन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भीमराव पांचाळे.

----------------
जेष्ठ कवी सुरेश भट यांनी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली
भीमराव पांचाळेः गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंचतर्फे आयोजन
कणकवली,ता. २३ ः माधव ज्युलियन यांनी मराठी गजलेचा पाया घातला असून जेष्ठ कवी सुरेश भट यांनी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि माधव ज्युलियन यांनी केलेल्या कार्यावर त्यांनी खर्या अर्थाने कळस चढविला असे प्रतिपादन गझलकार भीमराव पांचाळे यांनी येथे केले.
गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंच कणकवली यांच्यावतीने कणकवली येथील नगर वाचनालय सभागृहामध्ये गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय गझल लेखन व गायन कार्यशाळा झाली. यावेळी महाराष्ट्र व गोव्यातून विविध गजल लेखक व गजल आवड असणाऱ्या श्रोत्यांनी हजेरी लावली होती. दिवसभराच्या या कार्यशाळेमध्ये गजल लेखनातील विविध पैलूनुसार गजलेचे होणारे लेखन याविषयी गझल नवाज भिमराव पांचाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात गजल लेखनाविषयीचे विविध पैलू उलगडून दाखवले. गझल लेखन ही साधी, सरळ व सोपी गोष्ट नसून गजल लेखनामध्ये टतस्थपणा आवश्यक आहे. माणसाच्या जीवनातील सुखाच्या अनुभवांबरोबरच वेदनांचे विविध पट गजलेतून उलगडून दाखवले जातात. जगण्याच्या संदर्भातील साध्या साध्या गोष्टीही गझल लेखनातून काळजाला भेदून जाऊ शकतात याविषयीच्या अनेक शायऱ्या भीमराव पांचाळे यांनी म्हणून दाखवल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सुमधुर आणि भारदस्त आवाजामध्ये भीमराव पांचाळे यांनी गजल गायनाचे अनुभव पेश केले. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला लावणारा हा गजल लेखन व गायनाचा दिवस श्रोत्यांच्या सार्थकी लागल्याचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.
श्री. पांचाळे यांनी मराठी गजलेचा इतिहास, मराठी गजलेचा प्रवास याबाबत सविस्तर माहिती कथन करून गजललेखन करताना सांभाळावयाची पथ्ये, गजलेचा छंद, गजलेचे व्याकरण आदी अतिशय मौलिक माहिती दिली. ही कार्यशाळा घेण्यासाठी कणकवली येथील अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, मोहन कुंभार, संतोष कांबळे, रूपाली कदम शैलजा कदम, कल्पना मलये, संतोष कांबळे, अभिनेते निलेश पवार, विनायक सापळे, राजेश कदम आदींनी मेहनत घेतली. पुणे, रत्नागिरी, मिरज, सांगली आणि गोव्यासह सिंधुदुर्गातील गजल लिहिणाऱ्या अनेक नवोदित आणि प्रथितयश गजलकारांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून भीमराव पांचाळे चया मार्गदर्शनाचा लाभ घेतला. अखंड लोकमंचातर्फे महावस्त्र प्रदान करून भीमराव पांचाळे दादांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन कुंभार यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com