जिल्ह्यात 631 पैकी 138 जणांचे अर्ज वैध

जिल्ह्यात 631 पैकी 138 जणांचे अर्ज वैध

१५ (टूडे २ साठी)

आरटीई प्रवेश प्रक्रियेत १३८ अर्ज वैध


जिल्ह्यात ६३१ अर्ज दाखल ; मंडणगड, राजापुरात नोंदणी नाही

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गंत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत केवळ ६३१ जणांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. त्यातील १३८ जणांचे अर्ज वैध ठरले. मंडणगड, राजापूर या तालुक्यातून एकही नोंदणी झालेली नाही.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केला होता. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. उच्च न्यायालयाने शासनाच्या सुधारीत आदेशाला स्थगिती दिली. शासनाच्या नवीन नियमामुळे सर्वसामान्य मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेची वाट बिकट झाली होती. श्रीमंत मुलांसाठी इंग्रजी माध्यामाच्या खासगी शाळा तर सर्वसामान्य मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी झाली असती. मात्र उच्च न्यायालयाने शासनाचा हा निर्णच रद्द करून जुन्या पद्धतीनेच आरटीईची प्रवेश प्रक्रिया घेण्याच्या सुचना दिल्या. आता ८१२ जागा असून आत्तापर्यंत ४१५ जणांनी अर्ज दाखल केला आहे. ३१ मे अंतिम तारीख असणार आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार नोंदणी झालेल्या २ हजार ४३१ शाळांमध्ये १२ हजार ३४५ जागांवर प्रवेश दिला जाणार होता. मात्र पालकांच्या याचीकेमुळे न्यायालयाने ही प्रक्रिया जुन्या पध्दतीने राबवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

-----
चौकट
प्रवेशासाठी उपलब्ध जागा

* दापोली - २९
* मंडणगड - ३
* खेड - १२४
* चिपळूण - ७१
* गुहागर - ८
* संगमेश्वर - १०
* रत्नागिरी - १४६
* लांजा - ११
* राजापूर - ५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com