अर्चना घारेंचा तळवड़ेत व्यापारी वर्गाशी संवाद

अर्चना घारेंचा तळवड़ेत व्यापारी वर्गाशी संवाद

M85434
  
अर्चना घारेंचा तळवडेत
व्यापारी वर्गाशी संवाद 
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः वाढती महागाई आणि अन्य गोष्टींमुळे हैराण झालेल्या व्यापारी वर्गाच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी जाणून घेतल्या. तळवडे गेट तेथील व्यापारी वर्गाशी त्यांनी संवाद साधला. या भेटीदरम्यान संतोष भैरे, निवृत्ती आमरे, एकनाथ सावंत, श्री. गोडकर, मिलिंद पवार, श्री. दळवी, श्री. कांबळी यांच्याशी बांधकाम कामगारांच्या समस्या इतर व्यावसायिकांच्या अडचणी तसेच तळवडे गावच्या भविष्यातील विकासासंबंधी चर्चा केली.
अमोल पावणोजी (होडावडा), दत्तप्रसाद कुंभार या हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. वाढती महागाई, खाद्यपदार्थांचे वाढते भाव, व्यवसाय चालविण्यासाठी करावी लागणारी कसरत यासंबंधीची माहिती अर्चना घारे यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे होडावडा गावचे माजी अध्यक्ष विलास नाईक, प्रकाश नाईक, वेंगुर्ले तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. पेडणेकर यांच्याशी चर्चा विनिमय केला. त्यानंतर पेडणेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्या वेंगुर्ले येथील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितिशा नाईक, युवती अध्यक्ष सावली पाटकर, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com