वेंगुर्ले आगार नूतनीकरणातील त्रुटी दूर होणार

वेंगुर्ले आगार नूतनीकरणातील त्रुटी दूर होणार

swt235.jpg
85381
वेंगुर्लेः येथील आगाराच्या नूतनीकरण कामाची पाहणी करताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना कुबल व अन्य पदाधिकारी.

वेंगुर्ले आगार नूतनीकरणातील त्रुटी दूर होणार
एसटी प्रशानाकडून ग्वाहीः कामगार संघाच्या आंदोलनाला यश
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ः येथील आगाराच्या नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करत भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे काम बंद पाडले होते. या आंदोलनाची एस. टी. प्रशासनाने दखल घेत संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे काँक्रिटची उंची वाढविण्यात येईल, असे कळविले आहे. त्यामुळे संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, कामगार वर्गात विशेषतः कार्यशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वेंगुर्ले आगाराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी १६ मे रोजी बंद पाडले होते. याकडे आगार प्रमुखांचे लक्ष वेधत एस. टी. च्या बांधकाम अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी केल्याशिवाय हे काम सुरू करू नये, अशी मागणी केली होती. या मागणीची एस. टी. प्रशासनाने दखल घेत सहाय्यक अभियंता अक्षय केकरे व कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांना कामाची पाहणी करण्यास पाठविले.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आगार नूतनीकरणाचे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम निदर्शनास आणून दिले. जुन्या असलेल्या लोखंडी छपराला केलेली रंगरंगोटी, सडलेल्या लोखंडाला दिला जाणारा रंगाचा मुलामा, कार्यशाळेच्या ठिकाणी करण्यात येणारे काँक्रिटीकरणाचे काम सुद्धा चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आणले.
जोपर्यंत काँक्रिटीकरणाची उंची वाढवत नाहीत, तोपर्यंत हे काम बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर संघाने केलेल्या मागणीप्रमाणे काँक्रिटची उंची वाढविण्यात येईल, असे आज एस.टी. प्रशासनाने कळविले असून, संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

चौकट
आगारातील कामाची भाजपकडून पाहणी
दरम्यान, आज वेंगुर्ले आगारातील कार्यशाळेच्या काँक्रिटीकरणाची पाहणी करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, मच्छीमार सेलचे दादा केळूसकर, शशी करंगुटकर, सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाचे सखाराम सावळ, साई दाभोलकर, रघुनाथ तळवडेकर, दाजी तळवणेकर, प्रमोद परुळेकर, प्रकाश मोहिते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com