-मंडणगडात वाहतूक समस्येची ''कोंडी

-मंडणगडात वाहतूक समस्येची ''कोंडी

२ (टूडे १ साठी, मेन)

ग्राउंड रिपोर्ट -------लोगो


-rat२३p२३.jpg-
२४M८५३९९
मंडणगड: शहरात वाहतुकीची कोंडी ही समस्या गंभीर बनत आहे.
-rat२३p२४.jpg-
२४M८५४००
मंडणगड-बाणकोट मार्गावर झालेली वाहतूक कोंडी
-rat२३p२५.jpg-
२४M८५४०१
मुख्य चौक ते भिंगलोळी मार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी

-rat२३p२६.jpg-
२४M८५४०२
मुख्य चौकात सर्व बाजूने वाहने एकत्र येत असल्याने नियोजित उपाययोजनांची आवश्यकता आहे.
------------

मंडणगडात वाहतूक समस्येची ‘कोंडी’

चार दशक जुने अरुंद रस्ते ; बदलत्या काळात अपुरे, कायमस्वरूपी उपाययोजना हवी

इंट्रो
मंडणगड शहरात दोन पादचाऱ्यांना चारचाकी वाहनाने उडवल्याचे सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहराची वाहतूक समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. जिल्हा परिषद व बांधकाम विभागाचे ताब्यातील चार दशकातील जुन्या अंतरातील अरुंद रस्ते, रस्त्यांचे शेजारी झालेली बांधकामाची अतिक्रमणे, बाजू पट्याचा अभाव व रस्त्यांशेजारी होणारे बेकायदेशीर पार्कीग या समस्यांमुळे शहरातील बाजारपेठेसह तालुक्यातील सर्वच मुख्य ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या पादचारी व लहान वाहनांच्या अडचणींचे कारण ठरत आहे. पोलिस प्रशासनाचे तोकडे मनुष्यबळ, वाहतूक कोंडी या समस्या व्यवस्थापनात अडथळा ठरत आहेत. बदलत्या काळात वाहनांचे आकार, वजन क्षमता वाढली तरी तालुक्यातील सर्व रस्ते चार दशके जुने ३ ते ५ मिटरचे व अरुंद बाजूपट्टी, पार्किंगची व्यवस्था नाही ही वाहतूक कोंडीची कारणे ठरत आहेत. त्यामुळे शहराचा विकास आराखडा प्रत्यक्षात कार्यान्वित करणे काळाची गरज आहे. या समस्यांचे निराकरण व उपाययोजनांसाठी नगरपंचायतीने किती खर्च केला हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
- सचिन माळी, मंडणगड
------------
वाहतुकीचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक

कुंबळे नाका, म्हाप्रळ, मंडणगड शहर, भिंगळोली, पंदेरी, देव्हारे ही गजबलेले ठिकाणे वाहतूक कोंडीच्या समस्येच्या बळी ठरल्या आहेत. कारण या परिसरात काळानुरुप बाजारपेठा विकसित झाल्या आहेत. सर्व प्रकारची बांधकामे अगदी रस्त्यांचे शेजारी आली आहेत. दुर्दैवाने कोठेही वाहन तळाची सोय नसल्याने कुठल्याही प्रकारे वाहन उभे करण्यासाठी अधिकृत जागाच नाही. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने उभे केली जातात व तेच वाहतूक कोंडीचे कारण ठरते आहे. गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम व सर्वच प्रमुख मार्गावरुन चालणारी मायनिंगची अवजड वाहनांची वाहतूक यामुळे मोठ्या गाड्यांच्या वाहतुकीच्या प्रमाणात दोनशे टक्यांनी वाढ झाली आहे. आजही मंडणगड देव्हारे, मंडणगड-म्हाप्रळ व मंडणगड-कुंबळे हे दापोली खेड, महाड, मुंबई, पुणे या मुख्य शहराकांडे जाणारे रस्ते चार दशक जुनेच आहेत. त्यात शिमगा, गणपती, मे महिन्यांचा सुट्टीचा हंगाम व काही प्रमाणात पर्यटन हंगामाचे कालावधीत या जीर्ण रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असते. याची पोलिस प्रशासनाने नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र तालुक्याच्या मुख्य नाक्यांच्या ठिकाणी व संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या वेळोवेळी उत्पन्न होत आहे. शहराची मुख्य बाजारपेठ व बसस्थानक परिसरातील रस्ते हे समस्येने सर्वाधिक प्रभावीत आहेत. एप्रिल व मे महिन्यात त्याची सर्वाधिक प्रचिती आहे. शहरातील मार्गाचा दर्जा राष्ट्रीय महामार्ग असा झालेला असल्याने या परिस्थितीत भविष्यकाळात उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.
---------
शहरात एकही वाहनतळ नाही

तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी आणि शासकीय कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे खासगी वाहनाने येण्याचे प्रमाणात वाढले आहे. यासाठी लहान चारचाकी वाहने, तीन चाकी वाहने व दुचाकीचा वापर केला जातो. याशिवाय शहरातील खासगी अस्थापना, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दररोज शहरात येणाऱ्या गाड्यांची संख्या लक्षात घेता गाड्या पार्किंगसाठी वाहनतळाची आवश्यकता नेहमीच अधोरेखित झाली आहे. मात्र स्थानिक नगरपंचायत याकडे लक्ष देत नसल्याने बसस्थानकाचा परिसर व रस्त्याच्या बाजूला असलेली मोकळी जागा हा एकमेव मार्ग गाड्या पार्किंगसाठी शिल्लक राहतो. बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना रस्त्यांशेजारीच दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. शहरातील बाजारपेठेच्या तीनशेमीटरच्या अंतरात सर्व रस्त्यांच्या बाजूने होणार पार्किंग कायद्याने बंद केले तरी मोठ्या वाहनांच्या अडचणी दूर होतील. या परिसरात जेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांचा वावर असतो तेव्हा भीतीमुळे पार्किंग होत नाही. मात्र अनेकवेळा पोलिस कर्मचारी व होमगार्ड नसल्याचे लक्षात येताच पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरातील बाजारपेठेतील मुख्य नाक्यातील अडचणीमुळे होणारी वाहतूक कोंडी अनेकदा मंडणगड पंचायत समिती, नगरपंचायत व बँक ऑफ इंडियापर्यंत पोहचत असते. याकरिता नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. शहरात नुकत्याच झालेल्या अपघातानंतर वाहतूक कोंडीबद्दल समाजमाध्यमातून नागरीक चिंता व्यक्त करीत आहेत व वाहतूक कोंडीवर उपायांची मागणी केली जात आहे.
------------
बाजूपट्टीचा अभाव समस्येत टाकतोय भर

मुख्य रस्त्याचे शेजारी नसलेली बाजूपट्टी अडचणींचे ठिकाणी समस्येची तीव्रता आणखीन वाढवत आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व संबंधित यंत्रणांनी बाजूपट्टी व नंतर येणाऱ्या गटारांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मोक्याच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेकरिता आवश्यक उपाययोजना करण्याकडे यंत्रणा नेहमीच कानाडोळा करीत आहेत.
----------
मुख्य चौकात होतेय कोंडी

शहरातील मुख्य चौकात येणारे बाणकोट, पाट, भिंगलोळी, गांधी चौक, बस स्थानक या बाजूने येणारे सर्व रस्ते एकत्रित येत असल्याने वाहतुकीचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे कोंडी होते. मोठ्या गाड्या वळविण्यासाठी जागा कमी पडते. अवजड वाहतूक करणारी वाहने मध्येच रस्त्यात बंद पडत असल्याने ते वाहन जोपर्यंत बाजूला काढले जात नाही, तोपर्यंत ही वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे. या घटना आता वारंवार घडू लागल्याने याबाबत स्थानिक प्रशासन व पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृतिशील राहणे आवश्यक आहे.
-------
जीव मुठीत घेऊन चालावे लागते

मंडणगड शहरात पाट रोड, बाणकोट रोड व दापोलीकडे जाणाऱ्या मुख्य नाक्यातून नगरपंचायत, पंचायत समिती, व बँक ऑफ इंडियापर्यंत वाहतुकीचे नियम पाळून रस्त्यावरुन चालणारे पादचारी सुरक्षित राहिलेले नाहीत. या अंतरातून चालताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मागून कधी एखादी गाडी येऊन धडकेल, हे सांगता येत नाही. अरुंद रस्ता व वाढलेल्या वाहनांची रस्त्याच्या दुतर्फा सातत्याने सुरू असलेली वाहतूक पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालण्यासाठी जागाच शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे गर्दीतून मार्ग काढून चालावे लागते. हे पादचारी व वाहनचालक या दोघांसाठी धोकादायक आहे. सुरक्षेच्यादृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथची निर्मिती करण्याची गरज आहे. नगरपंचायत व संबंधित यंत्रणांनी याकडे गांर्भीयाने पाहावे अशी मागणी शहरातील समस्याग्रस्त त्रस्त पादचारी नागरिक करीत आहेत.
--------
- वाहतूक कोंडीची ठिकाणे
* मंडणगड - बाणकोट मार्ग
* मंडणगड - भिंगलोळी मार्ग
* मंडणगड - पाट मार्ग
* मंडणगड - गांधीचौक मार्ग
-------
कोट १
मंडणगड शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत वाहतूक पोलिस कायमस्वरूपी आवश्यक आहे. तसेच अधिकृत रिक्षा स्टँडची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. उपलब्ध स्थानक परिसरात पार्किंग व्यवस्था करावी अशी सूचना मांडण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्था झाल्यास कोंडी कमी होईल.
- विनोद जाधव, नगरसेवक तथा अध्यक्ष रिक्षा संघटना.
-----------
कोट २
रस्त्यांची परिस्थिती पाहता सण, सुट्टी आणि पर्यटन हंगामात शहरात वाहतूक पोलिस असणे आवश्यक आहे. मायनिंग अवजड वाहतुकीला वेळ मर्यादा ठरवून द्यायला हवी. तसेच शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने मिळेल त्या जागेत वाहनचालक गाड्या उभ्या करीत आहेत, त्यांनी सध्यस्थितीत सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे.
- वैभव कोकाटे, उपनगराध्यक्ष
----------
कोट ३
नो पार्किंगचे सूचना फलक कुठेच दिसत नाहीत. रस्त्यावर दुचाकी पार्किंग करण्यास मनाई करावी. आम्ही सांगायला गेलो तर जागा तुमची आहे का? अशी उद्धट उत्तरे मिळतात. सूचना फलक लावून कारवाई करण्यात यावी.
- समीर कदम, दुकानदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com