सावंतवाडी शहरातील विद्युत खांब धोकादायक

सावंतवाडी शहरातील विद्युत खांब धोकादायक

M85433

सावंतवाडी शहरात धोकादायक विद्युत खांब
महावितरणचे दुर्लक्षः तत्काळ न बदल्यास आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः शहरातील महावितरणच्या विद्युत खांबांची अवस्था बिकट झाली असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. याबाबत वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष केला जात आहे. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे यापूर्वी शहरात जिवितहानीच्या घटना घडल्या असून दोन दिवसांत हे खांब न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलैश गवंडळकर यांनी दिला आहे.
शहरातील सालईवाडा मच्छिमार्केट, भवानी चौक बाजारपेठ आदींसह शहरात ठिकठिकाणी जीर्ण पोल आहेत. महावितरणकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मुळातूनच हे पोल सडले असून मोठ्या वादळी पावसात ते जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे. बाजारपेठ, शाळा, कॉलेजसह रहदारीची ही ठिकाणं आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री. गवंडळकर यांनी याबाबत महावितरणच लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, "पावसाळा तोंडावर आला असताना मुळापासून सडलेले हे पोल केव्हाही पडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते पहाणी करत नाहीत. केवळ कर्मचाऱ्यांना आदेश देत आहेत. कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची काम होत नाहीत. यापूर्वी पाळंदे कुरिअरच्या गवस यांच्यासोबत घडलेली घटना सावंतवाडीकर विसरू शकलेले नाहीत. खांब बदलले नाही तर भविष्यात दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार? दोन दिवसांत यावर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com