उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटली ऐतिहासिक चित्रे

उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटली ऐतिहासिक चित्रे

८ (पान ४ साठीमेन)


-rat२३p२९.jpg, rat२३p३०.jpg, rat२३p३१.jpg, rat२३p३२.jpg-
२४M८५४१४, २४M८५४१५
खेड ः भरणे नाका येथील उड्डाणपुलाच्या भिंतींवर रेखाटलेली ऐतिहासिक चित्रे.
----------

उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटली ऐतिहासिक चित्रे

भरणेतील महामार्ग ; छत्रपती शिवरायांचे बालपण ते युद्धकलेपर्यंची चित्र

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगाची चित्रे भरणे येथील उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटण्यात आली आहेत.
चौपदरीकरणामुळे नव्याने उभारणी करण्यात आलेल्या पुलाच्या भिंतीवर चिपळूणमध्ये कोकणातील लोकसंस्कृतीची चित्रे साकारण्यात आली आहेत. त्यामध्ये दशावतार, पालखी नाचवणे, रसाळगड या सारख्या कलाकृतीचा समावेश आहे. भरणे येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्याच ठिकाणी महामार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीवर कलाकारांनी छत्रपतींच्या बालपणापासूनचे प्रसंग जिवंत केले आहेत. स्वराज्याची शपथ घेणारे बाल शिवराय ते युद्ध कला शिकताना छत्रपती शिवराय, बाजीप्रभू, युद्ध करणारे मावळे, राजमुद्रा आदी चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमुळे भरणे परिसर शिवमय झाला आहे. मे महिन्यातील रखरखत्या उन्हात चित्रकारांनी ही चित्रे साकारली आहेत. सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत चित्रकार चित्र काढण्यासाठी मेहनत घेत आहेत. साकारलेली ही चित्रे सुमारे तीन वर्षे पाहायला मिळणार आहेत. खेड, मंडणगड, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, महाड या ठिकाणचे चित्रकार यात सहभागी झाले असून निशांत वाघे (कॉन्ट्रॅक्टर), विशाल गुरव (चित्रकार) व अन्य यांच्यासोबत मदतीसाठी बाराजण सोबत घेऊन हे काम सुरू आहे. या चित्रांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही राजकीय पक्षांनी या भिंतीवर बॅनर लावू नयेत, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com