डेरवणमधील वादळात ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान

डेरवणमधील वादळात ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान

७ (पान ५ साठी)


-rat२३p३५.jpg-
P२४M८५४२५
चिपळूण ः डेरवण येथील नुकसानीची पाहणी करताना आमदार शेखर निकम.
-----------

डेरवणमधील वादळात लाखोंचे नुकसान

आमदार शेखर निकमांकडून पाहणी ; शिवसृष्टीला मोठा फटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः तालुक्यातील सावर्डेसह डेरवण येथे बुधवारी झालेल्या तुफानी वादळी पाऊसामुळे ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आमदार शेखर निकम यांनी तातडीने सावर्डे आणि डेरवण येथील नुकसानीची पाहणी केली. वादळी वाऱ्यात डेरवण येथील शिवसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
या वादळी पावसामुळे सावर्डे-डेरवण येथील दत्तमंदिर, धावडेवाडी, काजरकोंड, डेरवण रोड, गणेशवाडी येथील रस्त्यावरील व इतर ठिकाणी असलेली झाडे उन्मळून पडली. तसेच घरांवरील छपरेदेखील उडाली. त्यामुळे झाडांच्या निवाऱ्याखाली लावलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांवर झाडे पडल्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. आमदार शेखर निकम यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांसमवेत सर्व नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. ग्रामस्थांकडून सर्व माहिती घेत सर्वांना धीर दिला. अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सांगून तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश दिले. महावितरण अधिकाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधत नुकसान भरापाईबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी माजी सरपंच बाळुशेठ मोहिरे, जमीर मुल्लाजी, प्रकाश कानसे, सचिन बागवे, बाबू कातकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com