माकडं पकडण्याच्या मोहिमेला आंबवलीत आरंभ

माकडं पकडण्याच्या मोहिमेला आंबवलीत आरंभ

१३ (पान ५ साठी)


-rat२३p२८.jpg-
२४M८५४१०
दापोली ः आंबवली येथे पिजऱ्यात पकडलेली माकडं.
-------------
माकडं पकडण्याच्या मोहिमेला सुरवात

वनविभाग ; आंबवलीत ग्रामस्थांचे सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. २३ ः दापोली तालुक्यातील केळशीजवळील आंबवली (ता. दापोली) येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाने माकड पकडण्याच्या मोहिमेला सुरवात केली आहे. एका दिवसात २० माकडं पकडण्यात यश आले.
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाचे पथक माकड पकडण्यासाठी बुधवारी (ता. २२) सकाळी ६ वाजता आंबवली बुद्रुक या गावात दाखल झाले. परिसराची पाहणी करून गावातील माकडांचा अधिवास असलेल्या जागेची निवड करून वन विभागाच्या पथकाने माकडांसाठीचा पिंजरा लावण्यात आला. आंबे, शेंगा, केळी आदी फळांचे आमिष दाखवून माकडांना पिंजऱ्याकडे आकर्षित करण्यात आले. वन विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या माकड पकडण्याच्या पिंजऱ्यामध्ये माकड दाखल होतच पिंजरा बंद होतो. अशा प्रकारे आंबवली बु. येथील परिसरातून २० माकडे पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. पकडलेल्या माकडांना नागरी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या वेळी वनपाल सावंत, वनरक्षक गुरव, वनरक्षक अतळेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com