जिल्ह्यात ४०० खांबांसह दीड कोटीचे नुकसान

जिल्ह्यात ४०० खांबांसह दीड कोटीचे नुकसान

२८ (पान ५ साठीमेन)


-rat२३p३९.jpg-
२४M८५४३६
रत्नागिरी ः वादळी पावसामुळे कोसळलेले विजेचे खांब.
-------------------

जिल्ह्यात ४०० खांबांसह दीड कोटींचे नुकसान

वादळी पावसाचा महावितरणला फटका ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : वादळी वाऱ्यासह दोन दिवसात झालेल्या वळवाच्या पावसाने चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, सावर्डे आदी भागात महावितरणच्या ४०० विद्युत खांबांसह सुमारे दीड कोटींचे नुकसान झाले. शेतीचे २९.६ हेक्टरचे तर अंगणवाड्यांचे २ लाख १० हजाराचे नुकसान झाले आहे. यावर तत्काळ संबंधित विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरड प्रवण क्षेत्राचीही पाहणी केली आहे. अतिसंवेदनशील भागात स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
आपत्कालीन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदते ते बोलत होते. श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात साधारण सरासरी ३,२६४ मिमी पाऊस पडतो. १ जून पासून याची नोंद केली जाते. आता साधारण ३९.५ मीमी पाऊस झाला. यामध्ये २९.६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे तुरंबव, सावर्डेमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहक अंधारत होते. काल तुरंबव येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. आज उर्वरित ठिकाणचा झाला. लांज्यातही दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होता, तो सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महावितरणचे डीपी, विद्युत खांब आदीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे ४०० विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी २०० खांबांची दुरुस्ती झाली आहे. १३२ खांबाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. साधारण २१ हजार ८०५ ग्राहक बाधित झाले. यामध्ये महावितरणचे दीड कोटीचे नुकासान झाले आहे. सोनगाव, रिंगणे, तळवडे येथील अंगणवाडीचे २ लाख १० हजाराचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दरड प्रवण भागातही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील एक गाव असून त्यानाही स्थलांतराबाबत सूचना केल्या आहेत.
----------
चौकट-
१८ सॅटेलाईट फोन उपलब्ध
आपत्कालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा अधिक सक्षण करण्यात आली आहे. त्यासाठी १२ सॅटेलाईट फोन घेण्यात आले आहेत. पोलिस खात्याकडे ६ फोन आहेत. त्यामुळे संपर्क करायला सोपे जाणार आहे. ९४ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com