हातिवले येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

हातिवले येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

४२ ( पान ३ )

हातिवलेत दुचाकी अपघातात स्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर ः तालुक्यातील जैतापूर-हातिवले सागरी महामार्गावरील हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या पुढील उतारावर दुचाकी अपघातामध्ये जुवाठी येथील विजय विठोबा बाणे (वय ५०) हे जागीच ठार झाले.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जुवाठी येथील विजय बाणे हे आज दुपारी जुवाठी येथून दुचाकीने राजापूर येथे जात होते. हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयालगत असलेल्या उतारावर ते आले असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या चरीमध्ये गेली. यामध्ये त्यांच्या डोक्याला, चेहऱ्‍याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसही दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी उशीरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू होती.
विजय बाणे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असून ते मुंबई येथे वास्तव्याला असतात. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ते गावी आले होते. पुढील एक-दोन दिवसांमध्ये ते पुन्हा मुंबईला जाणार होते. मात्र, गावातून राजापुरात येत असताना वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेची माहिती मिळताच राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रसाद मोहरकर, राजेंद्र मयेकर, कशेळकर यांच्यासह जुवाठी गावातील ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com