-महामार्गाच्या बाजूचे मातीचे ढिगारे हटवा

-महामार्गाच्या बाजूचे मातीचे ढिगारे हटवा

६ (पान ५ साठी )


-rat२३p३४.jpg-
२४M८५४२४
रत्नागिरी ः महामार्गाबाबत वाहनधारकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराला सूचना केल्या.
-----------

महामार्गाच्या बाजूचे मातीचे ढिगारे हटवा

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह ः काम गतीने करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : पावसाळ्यापूर्वी मिऱ्या- नागपूर महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटविण्यात यावे. तसेच पालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती, साईड पट्टींचे काम करावे. महामार्गाचे कामही गतीने करण्याची सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी ठेकेदाराला दिल्या.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती, साईड पट्टी, कचरा, रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा, वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत आज पहाणी केली. पालकमंत्री सामंत यांनी आज सकाळी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली.
त्यांच्याच सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिंह यांनी तत्काळ पहाणी केली. मारुती मंदिर येथील चौकात वाहतूक सुरळीत होण्यासाठी पार्किग, स्टॉपिंग पट्टी करण्याबरोबरच या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला डांबरीकरणाचा थर करण्याची सूचना दिली. साळवी स्टॉप येथे चौपदरीकरणाची पाहणी करुन हे काम गतीने करण्याची सूचना दिली. पाऊस पडल्यानंतर बाजूला असणारे मातीचे ढिगारे वाहून चिखल होणार नाही, याची दक्षता घेऊन ते बाजूला करावेत, असेही जिल्हाधिकारी सिंह म्हणाले.
कुवारबाव आणि हातखंबा येथेही रस्त्याच्या कामाची पहाणी करुन दिशादर्शक फलक, रम्बलर लावण्याची सूचना केली. हातखंबा-पाली रस्त्यावरील कामाची पहाणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घ्यावेत. रस्त्याची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी १ जून पूर्वी ही कामे पूर्ण करावीत. ख्वाजा जमेरीनगर भागातील रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचरा निर्मुलनाचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावे. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहूल देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.
------------

रबर बोटींची व्यवस्था

पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, पोलिस यंत्रणांच्या माध्यमातून रबर बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाचे अथवा भरतीचे अर्लट असताना नागरिकांनी सतर्क राहून आपली आणि इतरांची काळजी घ्यावी.
--------------

धोकादायक साकव बंद करा
मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, मान्सूनच्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी अशी सूचना देण्यात आली आहे की, विद्यार्थी, लहान मुलांची काळजी म्हणून धोकादायक साकव बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com