देवगडवासीय वाहतूक कोंडीने बेजार

देवगडवासीय वाहतूक कोंडीने बेजार

swt2319.jpg
85449
जामसंडे : येथील बाजारपेठेत अशी वाहतूक कोंडी होत असते. (छायाचित्र : संतोष कुळकर्णी)

देवगडवासीय वाहतूक कोंडीने बेजार
पर्यटकांनाही फटकाः बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ः चाकरमान्यांची वाहने तसेच तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यावरील वर्दळीत वाढ झाली आहे. त्यामुळे देवगड-नांदगाव रस्त्यावरील प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. पर्यायाने चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील देवगड-जामसंडे शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्यावर अधूनमधून वाहतूक कोंडी होत असते. एसटी तसेच अवजड वाहने आल्यावर दुतर्फा वाहने अडकून पडतात. सध्या आंबा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. आंबा वाहतुकीची वाहने, आंबा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची वाहने तसेच एस. टी. आणि अवजड वाहतूक यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. रस्त्यालगत वाहने पार्किंग केली जात असल्याने त्याचा मोठा त्रास वाहन चालकांना होतो. अशावेळी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यावर बाजू देताना दोन्ही वाहनांच्या मागे वाहनांची रांग लागते. यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना तसेच पादचाऱ्यांना अडचणीचे ठरते.
अवजड वाहने, चारचाकी वाहने वाहतूक कोंडीमुळे खोळंबतात. पर्यायाने लांब पल्ल्याला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळी हंगाम असल्याने पर्यटक तालुक्याच्या विविध भागात पर्यटनासाठी येत असतात. एका ठिकाणच्या पर्यटन स्थळावरून दुसऱ्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरील वर्दळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. बाहेरील वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावरील रहदारी वाढलेली असते.
अशावेळी अवजड वाहने आल्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. चारचाकी वाहने खोळंबतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शिरगांव आणि तळेबाजार येथे आठवडी बाजारादिवशी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. वाहतूक कोंडीमुळे चालकांना वाहने हाकताना मोठी कसरत करावी लागते. सध्या गर्दीचा हंगाम असल्याने एस.टी. गाड्यांनाही प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी प्रवाशांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. लग्न व इतर धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानेही येणार्‍यांची संख्या अधिक असल्याने वाहनांची रस्त्यावर सतत वर्दळ असते. अशावेळी वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा त्रास सहन करावा लागतो.

चौकट
पादचारीही त्रस्त
जामसंडे बाजारपेठ, येथील महाविद्यालय नाका परिसरात वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. अशावेळी पादचार्‍यांनाही वाट काढणे अवघड बनत असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com