रस्त्याच्या चुकीच्या रचनेमुळे ट्रेलर अडकला

रस्त्याच्या चुकीच्या रचनेमुळे ट्रेलर अडकला

४४ ( पान ३ साठी)

-rat२३p ४५ .jpg -
२४M८५४५७
चिपळूण ः गुहागर बायपास येथे अडकलेला ट्रेलर.
------------
गुहागर बायपासवर ट्रेलर अडकला

क्रेनच्या मदतीने रस्ता केला खुला; वाहतुकीची कोंडी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः मुंबई-गोवा महामार्गावरील गुहागर बायपास या ठिकाणी गुहागरकडून येणारा ट्रेलर चुकीच्या रस्त्याच्या रचनेमुळे अडकला. सातत्याने या ठिकाणी असे प्रकार होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
गुहागरकडे जाणारी अवजड वाहने गुहागर बायपासमार्गे गुहागरकडे जात असतात. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएल प्रकल्प आहे. याशिवाय एल ॲण्ड टीच्या जेटीचे काम सुरू आहे. त्यामुळे अवजड ट्रेलर या मार्गाने जात असतात. मागील महिन्यात दोन ट्रेलर असेच अडकले होते. गुहागर बायपास व राष्ट्रीय महामार्ग विभागाला जोडणारा रस्ता तीव्र उताराचा आहे. यामुळे गुहागरकडून महामार्गावर येणाऱ्या ट्रेलरचा मधला भाग रस्त्याला लागतो. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. गुरुवारी सायंकाळी असाच एक अवजड ट्रेलर गुहागर बायपासहून आल्यावर मुंबईच्या दिशेने वळण घेत असताना मध्येच रस्त्याला लागला आणि अडकून बसला. यामुळे चौपदरी महामार्गावरील एक लेन पूर्णतः बंद झाली. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. याआधी देखील असे प्रकार सातत्याने घडले असून दोन क्रेनच्या माध्यमातून अडकलेले ट्रेलर काढावे लागले. सुमारे दोन तासांनी क्रेन आणून हा ट्रेलर काढण्यात आला. यानंतर चौपदरीकरणाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com