बनावट दागिने गहाण ठेवून
कर्जप्रकरणी एकास अटक

बनावट दागिने गहाण ठेवून कर्जप्रकरणी एकास अटक

बनावट दागिने गहाण ठेवून
कर्जप्रकरणी एकास अटक
रत्नागिरी, ता. २३ ः सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या टोळीने रत्नागिरी शहरातील श्री समर्थ भांडारी नागरी सहकारी पतसंस्थेसह कोल्हापुरातील एका बँकेच्या रत्नागिरी शाखेचीही फसवणूक केली आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी (ता २२) रात्री संशयितास अटक केली. योगेश पांडुरंग सुर्वे (रा. कुवेशी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १४ जानेवारी २०२३ ला घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने श्री समर्थ भांडारी नागरी सहकारी पतसंस्थत १४ जानेवारी २०२३ ला ५४ ग्रॅम वजनाच्या दोन चेन ठेवून १ लाख ८५ हजार व ३७ हजार रुपये असे एकूण २ लाख २२ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतले होते. श्री समर्थ भांडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या लक्षात आल्यानंतर किशोर खताते यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री अटक केली आहे. अन्य एका बँकेच्या शाखेची तक्रार दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र अद्यापही शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com