वादळी पावसाचा इन्सुलीला तडाखा

वादळी पावसाचा इन्सुलीला तडाखा

85514
.....................

वादळी पावसाचा इन्सुलीला तडाखा
मोठे नुकसानः घरांसह शेतमांगर बागायतींना फटका
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ः परिसरात आज पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाने इन्सुली येथे हाहाकार माजविला. यात प्रचंड वारा असल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. यात काहींच्या घरांचे, शेतमांगरांचे प्रचंड नुकसान झाले तर बागायतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
इन्सुली परिसरात वादळ झाले. यामध्ये इन्सुली येथील संतोष मेस्त्री यांच्या घराचे पत्रे, महादेव मांजरेकर यांच्या घराचे पत्रे, सखाराम मेस्त्री यांच्या घराचे पत्रे, निलेश मेस्त्री यांच्या शेत मांगरावर झाड कोसळले. पार्वती गावडे यांच्या घरावर झाड कोसळले. सचिन पालव यांच्या घराची कौले उडून गेली. नीलकंठ सावंत यांच्या शेत मांगरावरील पत्रे उडून गेले. कमलेश गावडे यांच्या घरावरील छप्पर उडून गेले. अस्मिता गावकर यांच्या घरावर झाड कोसळले. माधुरी गावकर यांच्या घरावरील पत्रे आणि राजाराम मेस्त्री यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तर इन्सुली-डोबवाडी येथील गंगाराम गजानन पेडणेकर यांच्या शेतघरावर झाड कोसळून नुकसान झाले. यामध्ये सर्वांचे मिळून अंदाजे वीस लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले.
इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा सावंत, रामचंद्र चराटकर, संतोष मेस्त्री तलाठी भक्ती सावंत, पोलीस पाटील जागृती गावडे, कोतवाल हळदणकर यांनी नुकसानीची पाहणी केली. मधुकर आईरच्या बागायतीमधील काजू, आंबा व फणसाची झाडे उन्मळून पडली. बाळू मेस्त्री यांची लागती काजूची झाडे उन्मळून पडली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामा न झाल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.
दरम्यान, बांदा परिसरात काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली. बांदा येथील भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पडलेल्या महाकाय वृक्ष पडला.
बांदा ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत तो हटवून बाजूला केला. बांदा तलाठी फिरोज खान यांनी बांदा, वाफोली व नेतर्डे येथे जात पंचनामे केले. बांदा शहरात वीज वितरणचे सुद्धा लाखो रुपयांचे नुकसान झाले. नेतर्डे व डोंगरपाल वगळता बांदा एकमध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त गावांचा वीज पुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरू करण्यात वीज वितरण विभागाला यश आले असल्याचे सांगण्यात आले. बांदा शहरात काल सायंकाळपासून रात्री साडे तीनपर्यत वीज वितरणचे युद्ध पातळीवर काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com