सायबाच्या धरणासाठी आठ कोटी निधी देऊ

सायबाच्या धरणासाठी आठ कोटी निधी देऊ

१७ (टूडे पान ३ साठी)

- rat२९p२१.jpg -
२४M८६५५९
राजापूर ः धरणाच्या बांधकामावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना शिवसेना नेते किरण सामंत आणि सहकारी.


सायबाच्या धरणासाठी आठ कोटी देणार

किरण सामंत ः धरणाचे बांधकाम सहा महिने रखडलेले

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः पुरेशा निधीअभावी काम रखडलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या कामाची सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी नुकतीच पाहणी केली. धरणाच्या कामासाठी अधिकचे आठ कोटी रुपये निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
राजापूर शहराची पाणीटंचाई दूर होताना लोकांना बारमाही मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी सायबाच्या धरणाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह शासनस्तरावर प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. नगर पालिकेने वाढीव निधीच्या मागणीचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालयासह आपल्याकडे सादर करा, अशा सूचना सामंत यांनी या वेळी केली आहे. या प्रसंगी सामंत यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, शहरप्रमुख सौरभ खडपे, माजी नगरसेवक विजय हिवाळकर, एजाज बांगी, ठेकेदार गदगूशेठ जाधव, नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या सायबाच्या धरणाच्या येथे नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. त्यासाठी शासनाकडून सुमारे दहा कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी अपुरा असून त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या वाढीव निधीची आवश्यकता आहे. हा निधी अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे धरणाचे बांधकाम सहा महिन्यांपासून रखडलेले आहे. नव्या धरणाच्या कामाची शिवसेनेचे नेते सामंत यांनी पाहणी केल्यामुळे त्याला गती मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. राजापूर शहराला आवश्यक मुबलक पाण्याचा प्रश्‍न त्यामुळे कायमस्वरूपी सुटणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com