लायन्स इंटरनॅशनल रिजन 
चेअरमनपदी गजानन नाईक

लायन्स इंटरनॅशनल रिजन चेअरमनपदी गजानन नाईक

87174

लायन्स इंटरनॅशनल रिजन
चेअरमनपदी गजानन नाईक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः लायन्स इंटरनॅशनलच्या रिजन चेअरमनपदी सावंतवाडी लायन्स क्लबचे गजानन नाईक यांची, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (एम.जे.एफ.) पदी एम. के. पाटील यांनी निवड केली आहे. रिजन सेक्रेटरी म्हणून अमेय पै यांची निवड झाली आहे.
सावंतवाडी लायन्स क्लब पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने रिजन चेअरमन आणि सेक्रेटरी यांची निवड करण्यात आली. लायन्स क्लबच्या ३२३४ डी १ या प्रांतात रिजन ५ मध्ये चार झोन असून, त्यात १९ क्लब समाविष्ट आहेत. त्यात रत्नागिरी, चिपळूण, न्यू रत्नागिरी, खेड, मंडणगड, सावर्डा, देवरुख, गुहागर, लोटे, दापोली, रॉयल चिपळूण, हातखंबा, खेड, खेड सिटी, मालवण, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या क्लबचा सहभाग आहे. सावंतवाडी लायन्स क्लब १९७५ मध्ये स्थापन झाला. सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवून लायन्स क्लबने ‘आम्ही सेवा देतो’ हे ब्रीद वाक्य सार्थ केले आहे. नवनियुक्त रिजन चेअरमन गजानन नाईक हे व्यवसायाने पत्रकार असून, त्यांनी लाईनीझममध्ये क्लब अध्यक्ष, झोन चेअरमन व अन्य पदे भूषविली आहेत. रिजन सेक्रेटरी अमेय पै यांनी सावंतवाडी लायन्स क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी म्हणून यशस्वी काम केले आहे. दोघांच्याही निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com