संगलट बौद्धवाडीवासीयांचा प्रवास यंदाही खड्ड्यांतूनच

संगलट बौद्धवाडीवासीयांचा प्रवास यंदाही खड्ड्यांतूनच

संगलट बौद्धवाडीवासीयांचा प्रवास खड्ड्यांतूनच

मंडणगड-दापोली-गुहागरला जोडणारा रस्ता; उपाययोजनेकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

खेड, ता. १ ः तालुक्यातील अति महत्वाचा आणि मंडणगड-दापोली-गुहागर यांना जोडला जाणारा रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या कोरेगाव-संगलट बौद्धवाडी रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दापोली, मंडणगड, गुहागर तालुकावासीयांचा प्रवास यंदाही खड्ड्यातूनच करावा लागणार आहे.

मे महिना संपला तरी तालुक्यातील अति महत्वाचा हा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. दळणवळणाच्या दृष्टीने आणि तीन तालुक्याला जोडणाऱ्या मार्गाची अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती झालेली नाही. या ५ किमीच्या टप्प्यात प्रचंड खड्डे पडले असून खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. तसेच एक ते दीड फूट पडलेले खड्डे यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्मिण झाली आहे. म्हणून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गावातील जागृत ग्रामस्थांनी आवाज उठवला. मात्र बांधकाम विभागाने याकडे अद्याप दुर्लक्षच केले आहे. या मार्गावर खेड-दापोली आगाराच्या एसटी बसेस धावतात. या गाड्यांना प्रवासी भारमानही चांगले आहे. मात्र खड्यातून धक्के खात प्रवाशांना आपला प्रवास करावा लागत आहे.
-----
वळणांना झाडाझुडपांचा अडथळा
या रस्त्यावर वळणांचे प्रमाण मोठे असून झाडाझुडपांचा वेढा पडला असल्यामुळे समोरून येणारे वाहनही दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या अरुंद रस्त्यात साईडपट्टीही गायब झाल्यामुळे एकावेळी दोन मोठ्या वाहनांना बाजू घेताना तारेवरची कसरत करावी लागते. याकडेही संबधित प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तीन कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com