रहाटाघर स्थानकात एसटीचा  वर्धापन दिन  साजरा

रहाटाघर स्थानकात एसटीचा वर्धापन दिन साजरा

rat१p१२.jpg-
P२४M८७१८५
रत्नागिरी- शहरातील रहाटाघर येथे प्रवाशांच्या हस्ते केक कापून एसटीचा वर्धापनदिन साजरा केला. या वेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी.
---------
रहाटाघर स्थानकात एसटीचा वर्धापन दिन

उत्सवाचे स्वरूप ; रांगोळी, फुलापानांचे तोरणांची सजावट

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १ : पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस १ जून १९४८ ला धावली. ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसपर्यंत पोहोचला आहे. रत्नागिरी विभागाचा हा आकडा ८०० झाला आहे. त्या निमित्ताने १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आज एसटीच्या येथील रहाटाघर बसस्थानकात प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर, पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
वर्धापनदिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुलापानांचे तोरणे बांधून सजविण्यात आली. एसटीची सेवा राज्यात देण्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसपर्यंत पोहोचला आहे. बसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बसस्थानकावरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा ३० पेक्षा जास्त समाजघटकांना एसटीच्या प्रवासीसेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.
गेल्या ७६ वर्षांत एसटी संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्यावस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत दळणवळण सेवा देत आहे. गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्यानिमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एसटी प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. शालेय सहली, लग्नसमारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठीही एसटी सेवा देत आहे. रत्नागिरीतील रहाटाघरामध्येही मोठ्या उत्सहात हा वर्धापनदिन साजरा केला. विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, प्रवाशांनी केक कापून, तोरणे बांधून आणि बसस्थानक सजवून हा वर्धापनदिनस साजरा केला.
---------------

सामंतांनी स्वखर्चांनी दिले एअर रनर मशिन

एसच्या वर्धापनदिनानिमित्त आज उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आगारातील यांत्रिक कर्मचाऱ्यांना टायर खोलणे व जोडण्याच्या कामासाठी लागणारे एअर रनर मशिन स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आगारातील सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
--------
कोट
एसटी ७६ वर्षांमध्ये सुदृढ आणि मजबूत झाली आहे. सुरक्षित प्रवास देणारी ही सार्वजनिक वाहतूक प्रवाशांना हवीहवीशी वाटू लागली आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विशेषकरून प्रवाशांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो.

- प्रज्ञेश बोरसे, रत्नागिरी विभागप्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com