अनामत रकमेची वीज बिले भरू नका

अनामत रकमेची वीज बिले भरू नका

अनामतची वीज बिले भरू नका

रमेश कदम ः ग्राहकांना शॉक न परवडणारा

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. १ ः महावितरणकडून पुन्हा एकदा बिलाबरोबर अनामत रकमेची बिलेही पाठवण्यात आली आहेत. यामुळे महागाईच्या खाईत अडकलेल्या वीजग्राहकांना आणखी एक शॉक लागला आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम आक्रमक झाले आहेत. नागरिकांनी ही वीजबिले भरू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. महावितरणने सक्ती केल्यास वीजग्राहकांना घेऊन महावितरणच्या विरोधात मोठ्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही रमेश कदम यांनी दिला आहे.
महावितरण अधूनमधून ग्राहकांना अनामत रकमेचा शोध देत असते. याप्रमाणे या वेळीही अनामत रकमेची बिले चालू बिलाबरोबर पाठवण्यात आली आहेत. याबाबत कदम म्हणाले, जीएसटी नोटबंदी अशा कारणांमुळे सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आता कुठे सर्व पूर्वपदावर येत असताना महावितरणने पुन्हा एकदा अनामत रकमेची बिले नागरिकांना पाठवली आहेत. महावितरण अडचणीत असताना त्याचा बोजा वीजग्राहकांवर का लादला जात आहे, असा सवाल कदम यांनी केला आहे. अनामत रकमेची बिले हा ग्राहकांसाठी महावितरणने दिलेला शॉक आहे. ग्राहकांनी ही अनामत रक्कम भरू नये, असे आवाहन कदम यांनी केले आहे. महावितरणने बिले २० जुलैला भरावीत, याची सक्ती केल्यास सर्व ग्राहकांना घेऊन महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल आणि महावितरणला जबरदस्त शॉक दिला जाईल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com