-''आरजू टेक्सोल'' च्या मास्टरमाईंडसाठी स्वतंत्र पथक

-''आरजू टेक्सोल'' च्या मास्टरमाईंडसाठी स्वतंत्र पथक

३२ (पान ३ साठी)


‘आरजू टेक्सोल’च्या मुख्य सुत्रधाराचा
दोन स्वतंत्र पथकाद्वारे शोध सुरू

जाधवला अटक करण्याचे प्रयत्न ; आर्थिक गुन्हे शाखेने कंबर कसली

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः आरजू टेक्सोल कंपनीचा मास्टरमाईंड अनी जाधव यांनी कंपनी स्थापनेपूर्वीच स्वत:ला वाचवण्यासाठी कंपनीच्या कागदोपत्री व्यवहारापासून तो दूर राहिला होता. कोणत्याही कागदपत्रावर त्याचे नाव नसल्याचे पुढे आले आहेच; मात्र कंपनी अडचणीत आली, आपले नाव त्यामध्ये आलेच तर आपण कसे, कुठे गायब व्हायचे असा ''प्लॅन'' त्याने पूर्वीच आखल्याचे तपासात पुढे येत आहे.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अनी जाधवचा पळून जाण्याचा ''प्लॅन'' यशस्वी झाला आहे. त्याच्या शोधासाठी जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत; मात्र तो नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुंतवणूकदारांना विविध आमिषे देत स्वयंरोजगाराचे गाजर दाखवत ही कोट्यवधीची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या विरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावरून गुन्हा दाखल करत दोन संचालकांना अटक केली तर अनी जाधवसह त्याचा सहकारी सावंत अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत.

जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास असून कंपनीचे एमआयडीसीतील सुसज्ज कॉफी, एक प्रशिक्षण केंद्र, गोदाम सील केली आहेत. मशिनरीसह कच्चा, पक्का असा सुमारे ४ कोटींचा माल पडून असल्याचे समजते; परंतु कंपनीची ही योजना एमआयडीसीत एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या अनी नामक व्यक्तीने संचालकांच्या डोक्यात घातली. शेफ म्हणून काम करत असताना संशयित त्याच्या संपर्कात आले. तेव्हा त्याने हा गुंतवणुकीचा फंडा त्यांना सांगितला आणि आरजू टेक्सोल कंपनी स्थापन झाली. विशेष म्हणजे हा मास्टरमाईंड कंपनीमध्ये कोणत्याच पदावर नाही. पडद्यामागून त्याने ही सूत्र हालवत कंपनी चालवली; परंतु आता तो कोणत्याही चित्रात नसल्याने पोलिस या मास्टरमाईंडच्या मागावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com