एसआयएलसी

एसआयएलसी

लोगो घेणे - एसआयएलसी

हळद आणि आले लागवड कार्यशाळा
कोल्हापूर, ता. १ ः आले व हळद लागवडीचा हंगाम सुरू झाला असून, अक्षय तृतीयेनंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांची लागवड करतात. पारंपरिक पद्धतीने लागवड केल्याने अपेक्षित उत्पादन व उत्पादकता मिळत नाही. ती वाढविण्यासाठी आधुनिक तंत्राने लागवड कशी करावी, लागवडीआधीचे व लागवडीनंतरचे व्यवस्थापन कसे असावे, याबाबत सविस्तर माहिती करून देणारी ‘आले-हळद लागवड तंत्रज्ञान’ ही दोनदिवसीय कार्यशाळा ८ व ९ जून रोजी कोल्हापूर येथे आयोजित केली आहे. कार्यशाळेत आले-हळद लागवडीचा परिचय, शेती अर्थव्यवस्थेतील याचे महत्त्व, आरोग्य फायदे व उपयोग, इष्टतम वाढीसाठी हवामान परिस्थिती, लागवडीसाठी जमीन तयार करणे, बियाणे निवड, आले-हळद पेरणीच्या पद्धती, अंतर व खोलीचा विचार, लवकर वाढीसाठी सिंचन पद्धती, पीक व खत व्यवस्थापन, तण नियंत्रण तंत्र, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणीनंतरची हाताळणी, बाजारासाठी आले-हळद प्रक्रिया, पॅकेजिंग व ब्रँडिंगची धोरणे, बाजार विश्लेषण व विक्री तंत्र आदींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

- कार्यशाळा सशुल्क असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७.
- ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com